अवैध नामांतर प्रकरण आता फक्त कागदावरच? नवीन मुख्याधिकाऱ्यांच्या आगमनाने चर्चांना उधाण!
वसमत (प्रतिनिधी ) :
नगरपरिषदेच्या वादग्रस्त अवैध नामांतर प्रकरणाची फाईल आता कायमची बंद होणार की दोषींवर कारवाई होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असताना पालिकेत नवीन मुख्याधिकाऱ्यांचे आगमन होताच या प्रकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
वसमत नगरपालिकेतील वादग्रस्त ठरलेल्या सर्वे नंबर 180 मधील मोकळ्या जागेचे नामांतरण प्रकरणी चौकशी होणार की फक्त कागदोपत्रिच राहणार सदरील प्रकरणावर नवीन पदभार स्वीकारलेले मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर या प्रकरणी काय कारवाई करतात यासाठी प्रशासकीय पातळीवर व तसेच नागरिकातर्फे लक्ष लागले आहे
राजकीय दबाव व तसेच भूमाफियांचे साठे लोटे याप्रकरणी मुख्याधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शासकीय मालमत्तांचे संरक्षण व होणाऱ्या अवैध हस्तांतरण हा कळीचा मुद्दा येणाऱ्या काळात नगर परिषदेसाठी होऊ शकतो मुख्याधिकारी याप्रकरणी कडक कारवाई करतील अशी अपेक्षा नागरिक करत आहेत
अवैध नामांतर प्रकरणी नगरपालिकेतील संबंधित कर्मचारी चौकशीसाठी अजून तरी पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करत नसल्याचे दिसून येत आहे आहे
तरी याप्रकरणी संपूर्ण चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे नवीन मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांनी सांगितले आहे
त्यामुळे हे प्रकरण कागदोपत्री न राहता कारवाई होईल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही
