केळी पिकांच्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदती साठी आ. नवघरे नी घेतली कृषी मंत्र्याची भेट
वसमत ( प्रतिनिधी ) :
वसमत तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार राजू भैया नवघरे यांनी कृषीमंत्री मा.श्री.दत्तात्रय मामा भरणे यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याबाबत निवेदन सादर केले.
नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बागांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
वसमत तालुक्यात झालेल्या या वादळी पावसामुळे संतोष केळी बागायतदार शेतकऱ्यांना भरपाईसाठी मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार राजू भैया नवघरे यांनी शेतकऱ्यांना दिले होते त्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्र्यांची भेट घेऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत साठी अपेक्षा पल्लवीत झाल्या आहेत सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात यावर नक्कीच चर्चा होऊन मदत मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्याकडून होत आहे
शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची भूमिका यावेळी मांडली..!
