जिल्हा शल्यचिकित्सकांनी काढले शेवटी NQAS अंतर्गत झालेल्या कामांचे चौकशीचे आदेश
रु.. 79.96 लाखांच्या विकासकामांची तांत्रिक, आर्थिक व गुणात्मक प्रशासकीय चौकशी करण्याचे वैद्यकीय अधीक्षकांचे पत्र
वसमत (प्रतिनिधी) :
वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात NQAS कार्यक्रमांतर्गत मंजूर निधीतून करण्यात आलेल्या सुमारे 79.96 लाख रुपयांच्या विकासकामांवर आता तांत्रिक, आर्थिक व गुणात्मक चौकशीचे स्पष्ट आदेश जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिले आहे
. त्यानुसार या कामांची निष्पक्ष उच्चस्तरीय तांत्रिक, आर्थिक व प्रशासकीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. व्ही. काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना दिले आहे.
या प्रकरणी मुद्द्यांच्या अनुषंगाने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय हिंगोली यांच्याकडूनही संबंधित पत्रव्यवहार झाल्याचे पत्रात नमूद आहे.
सरकारी आरोग्य यंत्रणेसाठी मंजूर झालेला निधी नेमका कुठे आणि कसा खर्च झाला? कामे अंदाजपत्रकानुसार झाली का? कामाचा दर्जा समाधानकारक आहे का? प्रत्यक्ष काम आणि कागदोपत्री नोंदी यामध्ये तफावत आहे का? या प्रश्नांची उत्तरे आता चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे.
वैद्यकीय अधीक्षकांनी संबंधित निवेदनातील मुद्द्यांची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी प्रकरण पुढे पाठविले आहे. त्यामुळे त्यामुळे या प्रकरणाला आता चौकशीचे ग्रहण लागल्याने वसमत मधील होत असलेल्या विकास कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे
लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांच्या विशेष प्रयत्नातून होत असलेल्या विविध विकास कामे दर्जेदार व्हावी व त्यासाठी कठोर पावले उचलण्यात यावी अशी अपेक्षा सामान्य नागरिकाकडून होत आहे
या चौकशीच्या माध्यमातून दोशीवर कठोर कारवाई होते का? व शासनाच्या झालेल्या शासकीय निधीचा गैरव्यवहार हा संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्याकडून वसूल करण्यात येतो का? निष्पक्ष चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा आहे
यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेले चौकशीचे आदेशातून महत्वपूर्ण बाबी समोर येतील अशी अपेक्षा नागरिकाकडून व्यक्त होत आहे
