रविकिरण वाघमारे यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाचा चौथा दिवस
वसमत प्रतिनिधी :
अंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी वसमत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर रवी किरण वाघमारे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
आज या उपोषणाचा चौथा दिवस असून, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवित मोठ्या संख्येने समाजबांधव उपोषणस्थळी उपस्थित राहत असून, शासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे
“अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी लढा सुरू आहे. या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही वसमत येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. आज आमच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, हीच आमची प्रमुख मागणी आहे. मागणी मान्य होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.
रविकिरण वाघमारे – उपोषणकर्ते
