“शिवेश्वर नागरी बँकेची गरुडझेप; १.७१ कोटींचा विक्रमी नफा!”
वसमत (प्रतिनिधी):
वसमत शहरातील श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक लिमिटेड, वसमत या बँकेने आर्थिक वर्ष 31 मार्च 2026 अखेर ₹1 कोटी 71 लाख 11 हजार इतका उल्लेखनीय नफा मिळविला आहे. ही माहिती बँकेचे अध्यक्ष श्री शिवदास बोड्डेवार यांनी दिली.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात बँकेने मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय प्रगती साधली आहे. बँकेची आर्थिक स्थिती भक्कम होत असून विविध घटकांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
📊 बँकेची आर्थिक स्थिती (31 मार्च 2026 अखेर):
वसूल भाग भांडवल: ₹8 कोटी 5 लाख 64 हजार
रिझर्व व ईतर फंड: ₹19 कोटी 22 लाख 7 हजार
ठेवी: ₹194 कोटी 45 लाख 20 हजार
कर्जवाटप: ₹117 कोटी 82 लाख 81 हजार
गुंतवणूक: ₹69 कोटी 32 लाख 14 हजार
खेळते भांडवल: ₹224 कोटी 63 लाख 19 हजार
CRAR: 16.45%
नेट NPA: 0% (झिरो टक्के)
ग्रॉस एन पी ए. 05.13 टक्के
अध्यक्ष बोड्डेवार पुढे म्हणाले की, बँकेच्या या यशामागे संचालक मंडळ, अधिकारी, शाखाधिकार व कर्मचारी यांचे संयुक्त प्रयत्न मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत.
या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष भारत नामपल्ली तसेच संचालक विनोद झंवर, दत्तात्रय दलाल, नागनाथ कोम्पलवार, बाळासाहेब जाधव, लक्ष्मीकांत कोसलगे, वसंत चेपूरवार, शेख मैनोद्दीन संदलजी, नारायण लाशिनकर, बालाजी माळवटकर, राधाकिशन साबणे, डॉ. धोंडीराम पार्डीकर, श्रीमती शकुंतलाबाई देवणे, सौ. रुपाली दगडू, अॅड. दीपक कटेकर, रमाकांत भागानगरे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे अॅड. वाघिले, प्रा. डॉ. सोनाजी पतंगे, अशोक सातपुते मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर व सर्व अधिकारी या वेळी उपस्थित होते.
बँकेने साधलेली ही आर्थिक प्रगती व शून्य एनपीए ही कामगिरी भविष्यातील अधिक भक्कम वाटचालीचे संकेत देणारी ठरत आहे.
