मा.खासदार रामरावजी वडकुते यांची सहस्त्रार्जुन अभ्यासिकेस भेट..
वसमत (प्रतिनिधी) :-
सो स क्षत्रिय समाज सरस्वती मंदिर वसमत येथे आज दिनांक 8/06/2026 रोजी *हिंगोलीचे राज्यसभा खासदार श्री रामरावजी वडकुते यांनी आज सरस्वती मंदिर येथील सहस्त्रार्जून अभ्यासिकेस सदिच्छा भेट दिली
यावेळी खासदार रामरावजी वडकुते यांनी अभ्यासिकेत सुरू असलेल्या कामकाजाविषयी विस्तृत माहिती जाणून घेतली तसेच सोबत सुयोग्य व्यवस्थापना बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले
यावेळी भा.ज.पा.चे कार्यकर्ते व कपिश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री आतिश भैय्या दांडेगावकर* सरस्वती मंदिर ग्रामसभेचे अध्यक्ष श्री अंबादास सावजी मनी सावजी, भा. ज. पा.शहर अध्यक्ष श्री विष्णू सावजी बोचकरी, प्रा.गणेश सावजी कमळू, श्री विजय सावजी कडतन,श्री विजय सावजी लांडगु,श्री संजय सावजी पवार, व अभ्यासिका व्यवस्थापक श्री प्रकाश गुजराथी यावेळी उपस्थित होते.
