वसमत च्या विकासासाठी आ. नवघरे नीं घेतली मुख्यमंत्र्याची भेट
वसमत ( प्रतिनिधी ) :
वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन वसमत तालुक्यातील विविध मागण्यांचे निवेदन सादर केले
यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील वसमत व औंढा नागनाथ तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना शासनामार्फत तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.
तसेच वसमत तालुका हा शैक्षणिक दृष्ट्या अतिशय मागास असल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर, पुणे,मुंबई अशा ठिकाणी जावे लागू नये यासाठी वसमत येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याची आग्रही मागणी केली.
याशिवाय वसमत व औंढा तालुक्यातील सुपीक व बागायती जमिनींमधून प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग जात असल्याने हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन या गावांमधून जाणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली.
तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळणारी मदत अधिक जलद व सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावी, जेणेकरून गरजू नागरिकांना वेळेत उपचार मिळू शकतील, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
वसमतच्या विकासासाठी सतत कार्यरत असणारे आमदार राजू भैया नवघरे यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन सदर प्रश्नांसाठी मागणी केली आहे
तरी मुख्यमंत्री महोदय या विविध मागण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देऊन वसमतच्या विकास साठी मदत करतील अशी अपेक्षा आहे
