राजर्षी शाहू महाराज विद्यालय आरळ येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
प्रतिनिधी :
राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आरळ येथे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून झाली. यावेळी राष्ट्रगीताने परिसर भारावून गेला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष प्रा.रमेश मानवते यांनी भूषविले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व सांगून देशाच्या प्रगतीसाठी जबाबदार नागरिक म्हणून योगदान देण्याचे आवाहन केले.
प्रमुख अतिथी म्हणुन दिलीप राखोंडे, प्रभाकर कातोरे, सुनील कातोरे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष तुकाराम राखोंडे, मुंजाजी कांबळे, प्रभाकर गायकवाड, मा.सरपंच कैलास राखोंडे, मा.सरपंच शेख गब्बर, दिगंबर राखोंडे, सुभाष वाहुळे, शिवाजी कुबडे, राणोजी कुबडे, संदीप कदम, भास्कर कातोरे, कैलास पंचलिंगे, ज्ञानेश्वर चोपडे, प्रकाश चोपडे, श्रीधर लांडगे, सुरज गायकवाड, नामदेव चव्हाण, प्रभाकर चव्हाण, आदी उपस्थित होते.शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली. “एक विद्यार्थी–एक झाड” या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला. शिक्षक, विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांनी वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली.कार्यक्रमास शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रभक्तीपर घोषणांनी करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार शाळेचे प्राचार्य गणेश काळे सर यांनी मानले
