वसमत येथे भाजप जनसंपर्क कार्यालयाचे मा. ना. मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन
जयप्रकाश दांडेगावकरांनी भाजप सोबत यावं – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण
वसमत / प्रतिनिधी
दि. १५ ऑगस्ट रोजी वसमत येथे भारतीय जनता पक्षाच्या नव्या जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमास राज्यमंत्री मेघनादीदी बोर्डीकर (साकोरे) तसेच माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकरावजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
नेत्यांच्या आगमनास काहीसा विलंब झाला असतानाही भाजपचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने संयमाने उपस्थित राहिले.यावेळी दोन्ही मान्यवरांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे तसेच कार्यक्रमाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचे कौतुक केले. उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
वसमत मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्यांची दखल घेत आतिष भैया दांडेगावकर हे प्रश्न मंत्रालय स्तरापर्यंत घेऊन जात असुन,त्यांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात यासाठी ते वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
कार्यक्रमादरम्यान संदीप कदम पाटील यांच्या माध्यमातुन अनेक नागरिकांनी आपल्या प्रलंबित समस्यांबाबतची लेखी निवेदने राज्यमंत्री मेघनादीदी बोर्डीकर यांच्याकडे सुपूर्द केली.बोर्डीकर यांनी आस्थेने ही निवेदने स्वीकारून संबंधित समस्यांवर आतिष भैया यांच्या पाठपुराव्यातुन लवकरात लवकर सकारात्मक मार्ग काढण्याचा विश्वास दिला.
वसमत मतदारसंघाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी हे जनसंपर्क कार्यालय सदैव तत्पर राहील,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
जयप्रकाश दांडेगावकरांनी भाजप सोबत यावं
महाराष्ट्रातील सहकाराचे गाढे अभ्यासक माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी भाजप सोबत यावे असे आवाहन यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले
राजकारण आयपीएलसारखं झालंय,अशोकराव चव्हाणांचा मिश्कील टोला
माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांनी आपल्या भाषणातुन सध्याच्या राजकारणावर मिश्कील भाष्य करताना,“राजकारण आयपीएलसारखं झालंय,” असा टोला लगावला.यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचा संदर्भ देत,ते भाजपमध्ये येता-येता राहुन गेले असुन, आता त्यांनाही भाजपमध्ये घ्या,असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
“जयप्रकाश दांडेगावकर गाडीत बसता-बसता राहिले, आता त्यांना लवकरच सोबत घ्या,”असे आवाहन अशोकराव चव्हाण यांनी केल्याने त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, नेते पदाधिकारी सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
