श्रावण सोमवार निम्मित तालुक्यातील शिवालय गजबजली
ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ सह विविध शिवालयात फराळाचे वाटप
वसमत (प्रतिनिधी ):
पवित्र श्रावण महिन्यातील सोमवारचे विशेष महत्त्व लक्षात घेता, वसमत तालुक्यातील सर्वच शिवमंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी पाहायला मिळाली. “ॐ नमः शिवाय” आणि “बम बम भोले” च्या जयघोषाने तालुक्यातील संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले आहे.
श्रावणी सोमवारनिमित्त तालुक्यातील ऐतिहासिक आणि जागृत शिवमंदिरांमध्ये विशेष विद्युत रोषणाई आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. पहाटेपासूनच महादेवाच्या पिंडीवर अभिषेक, रुद्रपठण आणि आरती करण्यासाठी शिवभक्तांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. यामध्ये महिला, तरुण आणि अबालवृद्धांचा मोठा समावेश होता.तालुक्यातील ग्रामीण भागातील तसेच शहरातील मुख्य शिवमंदिरांमध्ये दर्शनासोबतच फराळाचे आणि भजनांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वच मंदिरांच्या परिसरात पूजा साहित्याची, फुलांची आणि प्रसादाची दुकाने सजली असून एक प्रकारे या परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे.
आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथे भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले तालुक्यातील विविध शिवालयात फराळ वाटप करण्यात आला आहे
राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जर सोमवारी साप्ताहिक फराळाचे आयोजन विविध शिवमंदिरात करण्यात आले आहे
भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानेही कडक बंदोबस्त तैनात केला आहे.श्रावणातील या मंगलमय वातावरणामुळे वसमत तालुक्यातील बाजारपेठेतही मोठी उलाढाल पाहायला मिळत असून, एकूणच सर्वत्र उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.
