वसमत येथे बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी
वसमत /प्रतिनिधी
वसमत शहरात आज ईद-उल-अज़हा (बकरीद-ईद) मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील मुख्य ईदगाहसह विविध मस्जिदींम ध्ये देशाच्या प्रगती, शांतता आणि सामाजिक एकोप्यासाठी विशेष दुवा (प्रार्थना) करण्यात आली.
मुस्लिम समाजाच्या प्रमुख सणांपैकी दुसरी सर्वात मोठी ईद असलेली ईद-उल-अज़हा गुरुवार दि. २८ मे रोजी उत्सा-हपूर्ण वातावरणात पार पडली. उन्हाचा पारा वाढत असल्याने शहरातील मुख्य ईदगाह तसेच विविध मस्जिदी मध्ये सकाळी ६.३० ते ८.३० दरम्यान ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली. मुख्य ईदगाह येथे
हजारो मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहून ईदची नमाज अदा केली. या वेळी मुफ्ती विखायतउल्ला बेग यांनी नम ाज पठण केली तर ईदगाहचे इमाम व खतीब मौलाना अब्दुल बासित कासमी यांनी खुतबा दिला. तसेच मौलाना
देशाच्च्या प्रगती, शांतता व सामाजिक एकोप्यासाठी विशेष दुवा
मोबीन सिद्दीकी यांनी नगर परिषद व पोलीस प्रशास-नाचे सहकार्याबद्दल आभार मानले. दरम्यान, शहरातील सर्वच धार्मिक स्थळी देशाच्या प्रगतीसाठी, शांततेसाठी आणि सामाजिक सलोखा कायम रा हावा यासाठी विशेष प्रार्थना
करण्यात आली. ईद निमित्त शहरातील विविध समाज व क्षेत्रातील नागरिकांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
