आमदारांनी पाळला शब्द! ‘लोकपर्व न्यूज’च्या वृत्ताची दखल; शासकीय अभियांत्रिकीसाठी थेट मंत्र्यांची घेतली भेट’
वसमत( प्रतिनिधी ) :

“लोकपर्व न्यूज “च्या बातमीची दखल घेत आमदार राजू भैया नवघरे यांनी वसमत साठी शासकीय अभियांत्रिकी मंजूर करून घेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे लोकपर्व न्यूज शी बोलताना सुचित केले होते
त्या अनुषंगाने वसमत येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी राज्याचे मा.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन देत वसमत तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न प्रभावीपणे मांडला.
वसमत तालुका हा शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत मागास असल्याने याभागातील विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर,पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये तांत्रिक तसेच उच्च शिक्षणासाठी जावे लागू नये, तसेच स्थानिक पातळीवर दर्जेदार तांत्रिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी हा पाठपुरावा करण्यात आला आहे.
वसमत येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाल्यास हजारो विद्यार्थ्यांना मोठा लाभ होऊन त्यांना लागणारा शैक्षणिक खर्च कमी होणार आहे तसेच परिसराच्या शैक्षणिक, औद्योगिक आणि आर्थिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे..
शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वसमत तालुक्याला अभियांत्रिकी महाविद्यालय मंजुरी मिळाल्यास या भागातील विकासासाठी नक्कीच चांगला फायदा होईल अशी नागरिकांची अपेक्षा आहे माननीय आमदार राजू भैया नवघरे यांच्या तर्फे करण्यात येत असलेल्या प्रयत्नाबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे