गोवंश तस्करी प्रकरणी वसमतच्या उपनगराध्यक्षावर गुन्हा दाखल
वसमत (प्रतिनिधी ) :
वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन च्या हद्दीतील जवळा खंदारबन शिवारात वसमतचे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष इमरान अली नासिर अली यांच्यावर गोवंश तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबद्दल सविस्तर माहिती अशी की वसमत चे उपनगराध्यक्ष इमरान अली नासेर अली यांच्या जवळा खंदारबण येथील शेतामध्ये अवैधरित्या गोवंश कत्तलीच्या उद्देशाने अत्यव्यस्थ अवस्थेत आढळल्या प्रकरणी वसमत येथील गोरक्षक संघटनेने दिलेल्या माहितीवरून वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी छापा टाकून एक लाख 63 हजार रुपये किमतीचे गोवंश जप्त केले
सदरील प्रकरणी सापडलेले गोवंश कत्तलीच्या उद्देशाने बिना चारा पाणी वाचून तडफडत असल्याचे आढळून आले
त्यानुसार 205/2026 कलम 5 (अ), 5 (क), 9, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 सह कलम 11 (1) (आक (एच) प्राण्याचा छळ, आधी गुन्हा नोंदवण्यात आला आहे
प्रकरणी प्रकरणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सैनिक लोंढा, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे उपनिरीक्षक डक साहेब, विजय उपरे, बशीर दोसाने, साहेबराव चव्हाण राठोड व अन्य पोलीस कर्मचारी याप्रकरणी तपास करत आहेत
