टोकाई गडाचे रुपडे पालटणार, भव्य हेमाडपंती शैलीत होणार मंदिराचा विकास
पर्यटन वाढीसह परिसराच्या विकासाला होणार मदत
◊
वसमत ( प्रतिनिधी ) :
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील टोकाई गड येथील प्रसिद्ध श्री टोकाई माता मंदिराच्या हेमाडपंती शैलीतील नूतन मंदिराच्या उभारणीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या पार्श्वभूमीवर गडावर भक्तीमय आणि उत्साही वातावरणात श्री टोकाई माता मूर्ती स्थलांतर व स्थापना सोहळा ५ जुलै रविवारी रोजी नुकताच संपन्न झाला. या आमदार राजु नवघरे यांच्यासह परिसरातील हजारो भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
या विकास कामामुळे परिसरातील पर्यटन वाढी सह स्थानीकांना रोजगार निर्मिती होणार असल्याने कुरुंदा परिसरात आनंदाचे वातावरण आहे
आ. नवघरे यांनी श्री टोकाई मातेचे मनोभावे दर्शन घेतले आणि माता माऊलीची विधिवत महापूजा करून सुख-समृद्धीचे साकडे घातले.या पवित्र सोहळ्याला अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
यामध्ये आत्मानंद महाराज, विश्वचैतन्य महाराज आष्टीकर, महंत गुरुबाबा, उमा माई, बालुमामा ढोरे, सचिन भोसले, मुंजाजीराव दळवी, राजू पाटील इंगोले, आशीर्वाद इंगोले, आनंद बडवणे, कदम आदींची उपास्थिती होती याप्रसंगी बोलताना आमदार राजू नवघरे यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, टोकाई गड हे आपल्या भागातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचे स्थान आहे. येथे सुरू असलेले हेमाडपंती शैलीतील भव्य मंदिराचे उभारणीचे कार्य लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि हे पवित्र देवस्थान अधिक भव्य-दिव्य स्वरूपात भाविकांच्या सेवेत दाखल व्हावे, हीच आई टोकाई मातेच्या चरणी प्रार्थना असल्याचे त्यांनी सांगितले.
मूर्ती स्थापना सोहळा संपन्न झाल्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. अत्यंत शिस्तबद्ध आणि मांगल्याच्या वातावरणात हा सोहळा पार पडला.
