ॲड चंद्रकांत देवणे मित्रमंडळाच्या वतीने डॉ. निलेश डिग्रसे, गोविंद एजगे, वैभव त्रिमले यांचा सत्कार
समाजकार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा मित्र मंडळाचा उपक्रम
वसमत ( प्रतिनिधी ) :
लिंगायत समाजरत्न डॉक्टर निलेश डिग्रसे यांची वसमत डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा ॲड चंद्रकांत देवणे मित्र मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला याच कार्यक्रमात वसमतमध्ये क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर यांची जयंती महोत्सव यशस्वी करण्यात पुढाकार घेणारे समाजाचे तरुण तडफदार नेतृत्व गोविंद आप्पा एजगे , पाटीलनगर भागातील जयंती मंडळाचे पदाधिकारी वैभव त्रिमल्ले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
समाजातील होतकरू व समाजाभिमुख कार्य करणाऱ्या समाजातील समाजसेवकांचा व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका ॲड चंद्रकांत देवणे मित्र मंडळाची आहे या उपक्रमा अंतर्गत शुक्रवारी वसमत येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यामध्ये डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्षपदी वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर निलेश डिग्रसे यांची निवड झाली त्याबद्दल मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच महात्मा बसवेश्वर जयंती वसमत मध्ये अत्यंत उत्साहात शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने काढण्यात आली जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मंडळाचे प्रतिनिधी म्हणून जयंती समितीचेअध्यक्ष या नात्याने गोविंद आप्पा यजगे यांचा सत्कार करण्यात आला तसेच पाटील नगर भागातून महात्मा बसवेश्वर जयंती दरवर्षी काढणाऱ्या मंडळाचे पदाधिकारी प्रतिनिधी म्हणून वैभव त्रिमल्ले यांनी सत्कार स्वीकारला
ॲड चंद्रकांत देवणे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी मित्र मंडळाचे अध्यक्ष गजानन कापूसकरी, उपाध्यक्ष सत्यनारायण नखाते , सचिव दिगंबर हुसे,रमेशआप्पा पत्रे ,भैरवनाथ देशमुख ,चंद्रकांत महाजन ,लक्ष्मीकांत मुटकुळे, महादेव बेले,प्रा.संतोष खाकरे ,प्रभाकर बेले,अमोल संगेकर सोमनाथ हेरे,डॉ. गंगाधर हेसे,विजय कापसे,संजय बेंडके,राजेंद्र कापसे, रमेश दर्गू ,दीपक महाजन,अमोल संगेकर,श्याम धोंडे ,देवाशिष बेले, राधाकृष्ण पत्रे ,गजानन पत्रे ,काशिनाथ कापसे, विजय कापसे,नारायण महाजन ,बाळासाहेब नखाते,राजु नखाते, ॲड चंद्रकांत देवणे,केशवआप्पा महाजन,रमेश बोचरे,गजानन पत्रे, वाणी समाजाचे अध्यक्ष मन्मथआप्पा बेले यांच्यासह मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते
