वसमत तालुक्यातील विविध प्रश्नांसाठी आ. नवघरे यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट
वसमत प्रतिनिधी :
वसमत तालुक्यासह जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत व मराठा आरक्षणासाठी लढत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेण्यासाठी वसमत चे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांनी उपमुख्यमंत्री सुनिता ताई पवार यांची भेट घेऊन तालुक्यातील प्रश्न मांडले
महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेऊन वसमत विधानसभा मतदारसंघासह हिंगोली जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण प्रश्नांबाबत चर्चा केली.
संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे सुरू असलेले उपोषण आणि त्यामागील मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी केली.
तसेच, यंदा अत्यल्प पावसामुळे वसमत तालुक्यासह संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची गंभीर दखल घेऊन संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात तसेच दुष्काळसदृश परिस्थिती मुळे वसमत तालुक्यातील गोजेगाव येथील कमलबाई सोपान कांदे या महिला शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी व शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ठाम उपाययोजना करण्यात याव्या अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली..
आमदार राजू भैया नवघरे यांनी उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार यांची भेट घेतल्या कारणाने वसमत तालुक्यातील प्रश्न सोडवण्यास नक्कीच मदत होईल अशी अपेक्षा नागरिकाकडून होत आहे
