वसमत येथे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे शांतता समितीची बैठक संपन्न
तरुणांनी व्यसनाधीनते पासून दूर राहावे : आ.राजूभैया नवघरे
वसमत ((प्रतिनिधी) :
आगामी काही दिवसात येणाऱ्या सण उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे शांतता समितीची बैठक वसमत येथे पार पडली
वसमत येथील सूरमणी प्रा. दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह येथे हिंगोली जिल्हा पोलीस प्रशासन व वसमत शहर पोलीस प्रशासनाच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक मा. सुधीर वाघ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश उत्सवानिमित्त शांतता बैठक संपन्न झाली
यावेळी आमदार राजू भैया नवघरे यांनी मार्गदर्शन करत आगामी काळात येणाऱ्या सण उत्सव व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात व तालुक्यात शांतता सलोखा कायम ठेवण्यासाठी नागरिकांना आव्हान केले आहे तसेच तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी सुद्धा मार्गदर्शन केले आहे
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोंढा यांनी मार्गदर्शनपर बोलताना उत्सवात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर रोखठोक मत व्यक्त केले ध्वनी प्रदूषण व डीजे चा वापर गणेश उत्सव मंडळांनी टाळावा किंवा कायद्याची उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल असे यावेळी त्यांनी सुचित केले
त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ .श्री . श्रेणिक लोढा ( पोलीस अधीक्षक हिंगोली ) राजकुमार केंद्रे साहेब (उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत ), मा.लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे, कन्हैया बाहेती, विकास माने ( उपविभागीय अधिकारी वसमत )मा . आशुतोष चिंचाळकर ( मुख्याधिकारी न.प. वसमत ) माजी नगराध्यक्ष शिवदासजी बोड्डेवार साहेब, उपनगराध्यक्ष राजकुमार ऐगडे, मौलाना साहेब, एम .ए .सिबी अधिकारी, हट्टा,कुरुंदा पोलीस अधिकारी, पत्रकार बांधव, गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित, होते या कार्यक्रमाचे आयोजक श्री राजकुमार केंद्रे ( उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत ) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . प्रमोद वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन, पोलीस निरीक्षक मा. सुधीर वाघ यांनी केले
यावेळी उपस्थित विविध मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषण करून उपस्थितांना आगामी गणेशोत्सव शांतता, सलोखा,कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले
( छाया कृष्णा देवणे वसमत )
