मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर संपन्न
*सेवा, समर्पण आणि समाजहिताचा संगम; भाजपाचा ‘सेवा यज्ञ – महारक्तदान संकल्प सोहळा’ संपन्न*
वसमत :
दिनांक 24 जुलै 2026 रोजी महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, वसमत यांच्या वतीने सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आलेला “सेवा यज्ञ – महारक्तदान संकल्प सोहळा” भारतीय जनता पार्टी कार्यालय, मामाश्री कॉम्प्लेक्स, नांदेड रोड, वसमत येथे सेवाभावी वातावरणात दिमाखात संपन्न झाला.
समाजहिताची भावना जोपासत आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा वर्ग तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात तब्बल १९४ रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान करून अनेक गरजूंना जीवनदान देण्याचा संकल्प प्रत्यक्षात साकार केला. या अभूतपूर्व प्रतिसादामुळे शिबिराला विशेष यश लाभले.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता पार्टीचे BLA-1 वसमत विधानसभा प्रमुख श्री. आतिश भैय्या दांडेगावकर यांनी विशेष पुढाकार घेत नियोजन, समन्वय व संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. तसेच वसमत विधानसभा अंतर्गत चारही मंडळांचे अध्यक्ष श्री. विष्णू बोचकरी, श्री. अवधूत शिंदे, श्री. ज्ञानेश्वर मुंजाळ आणि श्री. राजू पाटील आहेर यांनी गावागावांत संपर्क मोहीम राबवून कार्यकर्त्यांना प्रेरित केले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे मोठ्या प्रमाणात रक्तदाते शिबिरात सहभागी झाले आणि हा उपक्रम यशस्वी ठरला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, कार्यकर्ते,आणि डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड यांच्या वैद्यकीय पथकाने मोलाचे योगदान दिले व सहकार्य केले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा सेवा उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने सर्व रक्तदाते, वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान, रक्तदान म्हणजे जीवनदान” या संकल्पनेवर आधारित भारतीय जनता पार्टीने सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम ठेवत भविष्यातही अशाच लोककल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित श्री.शिवदास बोड्डेवार, श्री.खोब्राजी नरवाडे, गणेश कमळू, डॉ. मारोती क्यातमवार, आदित्य देशपांडे, शिवाजी अलडिंगे, विजय नरवाडे, अमोल मुळे, बालाजीराव जाधव, सीताराम म्यानेवार, मयूर नावंदर, माणिकराव सावंत, भगवान कुदाळे, राजेश भालेराव, गोविंद येजगे, डॉ. मारोती बुट्टे, प्रभाकर रेंगे, भारत स्वामी, गजानन पप्पलवाड, ग्यानोजी काळे, शुभम शिंदे, स्वप्निल मुळे, संजय कळणे, अविनाश गायकवाड, शिवाजी गोरे, दिलीप पवळे, सुनिल आकाशे, बालाजीराव जांभळे, संजय सूर्यवंशी, मोईन इनामदार, केदार भालेराव, रवि सूर्यवंशी, सिताराम जाधव, नागनाथ डाढाळे, कृष्णा भालेराव, सुमित शिंदे, मयूर अंबेकर, विष्णू शहाणे, अर्जुन बेंडे, संदीप भालेराव, गोपाळ माने, संजय सवंडकर, शिवम नामेवार, माणिक पांचाळ, नारायण सातपुते, विष्णुकांत माखने, दिलीप गजभार, गोविंद शिंदे, बाबाराव शिंदे, ऋषिकेश शेळके, देवानंद क्षिरसागर, अभय शिकारी, गोपाळ चकोर, विष्णुकांत सातपुते, रमेश नामेवार, संदीप ढाले, उद्धव शिंदे, सिद्धार्थ दवणे, ईश्वर नरवाडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करत प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन केले.
