महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी दक्षता समितीने सजग राहावे: डॉ. निलाभ रोहन
हिंगोली ( प्रतिनिधी ) :
दिनांक ३०.०५.२०२६ रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. डॉ. निलाभ रोहन सर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तसेच सर्व १३ पोलीस स्टेशन अंतर्गत नेमण्यात आलेल्या महिला दक्षता समितीमधील सदस्य व सचिव यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती.
पोलीस स्टेशन स्तरावर तकार घेवुन रोणा-या महिलांना सौजन्याची वागणुक देणे, महिलांकडुन प्राप्त तक्रारींची विनाविलंब दखल घेणे, पिडित महिला व मुलींच्या तक्रारी संवेदनशिलतेने हाताळणे याकरीता समाजातील विविध घटकांचे सहकार्य घेणे या उद्देशाने मा. अपर पोलीस महासंचालक, म. बा.प्र.वि., म.रा. मुंबई यांचे सुचनेप्रमाणे व मा. पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सदरची बैठक आयोजित केली होती.
सदर बैठकीमध्ये जिल्हा महिला दक्षता समिती सदस्य मानसोपचार तज्ञ डॉ.श्री. टिपक डोणेकर, विधीअधिकारी श्रीमती. अनुसया पंडित, केंद्रिय शाळा शिक्षिका श्रीमती. मिरा गणगे यांनी बैठकीकामी उपस्थित सर्व महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी मा. पोलीस अधीक्षक यांनी उपस्थित दक्षता समिती सदस्य महिला यांना महिला व बालकांविरूदधच्या तपासामध्य तक्रार घेणेपासुन ते पिडितेला मानसिक पाठबळ, वैदकिय मदत, निवारा मदत ई. बाबींमध्ये आवश्यक ती पोलीस मदत करणेबाबत महिला समिती सर्वांची भुमिका अत्यंत महत्वाची असलेबाबत मत व्यक्त केले.
सदर महिला दक्षता समिती बैठकीमध्ये अध्यक्ष मा. पोलीस अधीक्षक साहेब श्री. डॉ. निलाभ रोहन सर, सचिव पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. केंद्रे, महिला पोलीस निरीक्षक, शालिनी नाईक तसेच जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन महिला दक्षता समिती सदस्य, सचिव, दुच्यम अधिकारी व महिला पोलीस अमंलदार उपस्थित होत्या.
श्रीमती. सपोनि. प्रेमलता जगताप यांनी बैठकीचे सुत्रसंचालन केले असुन भरोसा सेल चे पोउपनि श्री. शेख., मसपोउपनि श्रीमती पेंदोर, मपोह / अनिता जाधव, मपोना / सिमा पाटिल, मपोशि/घुमनर समुपदेशक श्री. खोडवे ईत्यादीने सदर बैठकीचे आयोजन केले.
