बाभूळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न.
वसमत ( प्रतिनिधी ) :
वसमत तालुक्यातील मौजे बाभुळगाव येथे दी 12/5/2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आले.
मा. उपविभागीय अधिकारी वसमत श्री विकास माने साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार वसमत श्री विनोद डोणगावकर साहेब यांच्या उपस्थितीत बाभुळगाव येथे शिबिर संपन्न झाले
बाबुळगाव मंडळातील जनतेसाठी मंडळ स्तरावर नागरिकांसाठी शिधा पत्रिका वाटप, उत्पन, जातीचे, इ प्रमाणपत्र वितरण, विविध शासकिय योजना बाबत मार्गदर्शन, सं. गा. यो./श्रावण बाळ/ इ. गा. यो पात्र लाभार्थी यांना प्रमाणपत्र वाटप, पुरवठा विभाग विषयक कामकाज, आरोग्य विभाग, कृषी विभाग इ. विविध शासकिय योजनाचा प्रत्यक्ष मंडळ स्तरावर लाभ नागरिकांना देण्यात आला. मा. उपविभागीय अधिकारी विकास माने व तहसीलदार विनोद डोनगावकर यांनी उपस्थित नागरिकांना विविध शासकिय योजना बाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमस्थळी मा. ना तहसीलदार श्री हांडे साहेब, श्री अनिल पाटील साहेब, मंडळ अधिकारी श्रीमती सुप्रिया जिंतुरकर मॅडम,ग्राम महसूल अधिकारी श्री गुड्डलवर साहेब, श्री पांडे साहेब, श्री पाईकराव साहेब , श्री सुधीर इंगळे साहेब,श्रीमती पडोले मॅडम, श्री सर्कलवाड साहेब, श्री राठोड साहेब, कोतवाल, पोलीस पाटील, सरपंच व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ हजर होते.
