पत्रकाराला धमकी अन् शासनाची फसवणूक; ‘त्या’ गुत्तेदारावर तातडीने गुन्हा दाखल करा!
वसमत ( प्रतिनिधी ) :
वसमत उपविभागीय अधिकारी यांचे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानिरीक्षकांना पत्र
वसमत – बसस्थानक इमारतीच्या बांधकामात बनावट कागदपत्रांद्वारे शासनाची फसवणूक करणाऱ्या गुत्तेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यास ताब्यात घ्यावे या संदर्भाचे पत्र उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी नांदेड परिक्षेत्राचे विशेष उपमहानिरीक्षक दिले आहे. बोगस कामाची पोलखोल करणाऱ्या पत्रकारास धमकी दिल्याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत ही कारवाई होईल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत माहिती अशी की वसमत येथे पुढील ४० वर्षे सेवा देणाऱ्या नूतन बस स्थानकाच्या इमारतीचे मागील तीन वर्षापासून काम सुरू आहे यासाठी शासनाकडून तब्बल साडेनऊ
कोटीचा निधी मंजूर झालेला आहे. मात्र बांधकामाच्या सुरुवातीपासूनच बोगसगिरीचे ग्रहण लागलेली ही
सार्वजनिक इमारत गुत्तेदाराच्या मनमानी ने जास्त गाजत आहे. बोगस कागदपत्राद्वारे शासनाची कोट्यावधीची रॉयल्टी भरली असल्याचे भासवणे, बांधकाम इस्टिमेट मध्ये दिल्याप्रमाणे दर्जेदार
साहित्य वापरण्याऐवजी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, तात्पुरता प्रवासी निवार्यातील असंख्य गैरसोयीबरोबरच
प्रवाशांची होणारी गैरसोय यावर पत्रकार मुनिरोद्दीन फारुखी यांनी आवाज उठवून जनतेसमोर बोगस कामाचा भ्रष्टाचार उघड केला.
यामुळे संतप्त झालेल्या संबंधित गुतेदाराने बांधकामात सुधारणा
करण्याऐवजी पत्रकार मुनिरोद्दीन फारुखी यांना धमकी दिली. याबाबत पत्रकार संरक्षण कायदा
त्यानुसार उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांना पत्र देऊन संबंधित गुत्तेदारावर बनावट कागदपत्राद्वारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तसेच पत्रकारास धमकी दिल्याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करावा यासंदर्भाचे पत्र दिले आहे. आता संबंधित गुत्तेदाराबर फौजदारी गुन्हा दाखल होणार का याकडे सर्व सामान्याचे लक्ष लागले आहे.
वसमत बसस्थानक बांधकाम प्रकरण
कायद्यानुसार, बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची फसवणूक केल्यास तसेच धमकीसारखे प्रकार घडल्यास संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हा नोंदविण्याची तरतूद आहे. तसेच पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत पत्रकाराला धमकी दिल्याचा आरोप असल्यास स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही अपेक्षित आहे.
या प्रकरणात वरिष्ठ पातळीवरून गुन्हा नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे
