SIR अंतर्गत १९, २०, २६ व २७ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष शिबिरांचे आयोजन
दावे व हरकती दाखल करण्यासाठी प्रशासनातर्फे आवाहन
वसमत (प्रतिनिधी) :
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये विशेष सखोत संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision- SIR) 2026 अंतर्गत ९२-वसमत विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांच्या गणना प्रपत्रांची (Enumeration Forms) घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात आली असून, मतदान केंद्रांची सुसूत्रीकरण व पुनर्रचना (Rationalisation) प्रक्रियाही यशस्वीरित्या राबविण्यात आली आहे. या कार्यालयाच्या दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजीच्या प्रसिद्धी पत्रकान्वये मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी (Draft Electoral Roll) प्रसिद्ध करण्यात आली होती.
पुनरीक्षणापूर्वीची व प्रारूप यादीतील तुलनात्मक आकडेवारी पुढीलप्रमाणे :
तपशील
एकूण मतदार
मतदार मागील (१८-०६-२०२६)
३.१०,९७९
प्रारूप यादी (३०-०८-२०२६)
२९०,२२१
पुरुष
१६२९१६
१५०,५५३
स्त्री मतदार
१५५०५७
१३९६६४
तृतीयपंथी मतदार
6
4
लिंग गुणोत्तर (दर हजार पुरुषांमागे स्त्री मतदार)
१५२
१२८
ज्येष्ठ नागरिक मतदार
४,३९८ (१.३६६)
४०१७ (१३८%)
युवा मतदार (वय १८ ते १९ वर्षे)
१९७८५ (३.७१%)
८ (०.००%)
दिव्यांग (PWD) मतदार
२,३१२ (०.७३%)
2ths (Br)
मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वसमत 92-वसमत विधानसभा मतदार संघ निवडणुक विभाग
मतदान केंद्रांची संख्या पूर्वी ३२७ होती, ती सद्यस्थितीत ३३९ इतकी झाली आहे. एकूण वितरित गणना प्रपत्रांपैकी (३,१७,९७९ १००%) २९०.२२० (९१.२७%) गणना प्रपत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.
पूर्वीच्या मतदार यादीच्या तुलनेत ज्या मतदारांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत, त्यामागील कारणे पुढीलप्रमाणे आहेत मृत्यू झालेले मतदार ८.१५१ (२.५६%), स्थलांतरित/सापडलेले ३,२०० (१.०१%), कायमस्वरूपी स्थतांतरित १३,५०९ (४.२५%), आधीच अन्यत्र नोंदणीकृत २.८५७ (०.९०%) व इतर कारणे ४२ (०.०१%) असे एकूण २७.७५९ (८.७३%) मतदार वगळण्यात आले आहेत. यापैकी युवा मतदार (वय १८-१९) या वर्गवारीतील घट प्रामुख्याने SIR प्रक्रियेत या वयोगटातील गणना प्रपत्रांची पडताळणी व प्रारूप यादीत समावेश करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्यामुळे दिसून येत आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईपर्यंत यात सुधारणा अपेक्षित आहे.
दावे व हरकती कालावधी आणि विशेष नोंदणी शिबिरे
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या दिनांक ०९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्रान्वये, प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती सादर करण्यासाठी दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांकडून नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदीची दुरुस्ती व नाव वगळणीसाठी अर्ज संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा तहसील कार्यालय, वसमत येथे सादर करता येतील.
राज्यातील एकूण ९७८ कोटी मतदारांपैकी सुमारे १५४ कोटी (१६%) मतदारांची नावे गैरहजर/स्थलांतरित किंवा अन्य कारणांमुळे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत. अशा मतदारांना त्यांच्या सध्याच्या रहिवासाच्या ठिकाणाहून मतदार यादीत नव्याने नाव अंतर्भूत करण्यास दावे व हरकतीच्या कालावधीत संधी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, दिनांक ०१.१०.२०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नवमतदारांना मतदार यादीत नाव अंतर्भूत करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
सबब, ९२-वसमत विधानसभा मतदारसंघातीत दिनांक १९, २०, २६ व २७ सप्टेंबर २०२६ या चार दिवशी मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर सकाळी १०.०० ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (BLO) नागरिकांचे नवीन नोंदणी दुरुस्ती व नाव वगळणीचे अर्ज स्वीकारण्यात येतील. शिबिरांमध्ये महिला तसेच दिव्यांग नागरिकांच्या समावेशनास विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच नवयुवक मतदारांच्या नोंदणीसाठी मतदारसंघातील शाळा व महाविद्यालयांमध्येही कार्यालयीन वेळेत स्वतंत्रपणे विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वसमत 92-वसमत विधानसभा मतदार संघ निवडणुक विभाग
मतदारांना आवाहन
९२-वसमत विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत आपले नाव, वय पत्ता व इतर तपशील आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर अथवा तहसील कार्यालय, वसमत येथे जाऊन अथवा ECINET / भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर तपासून पहावेत. यादीत नाव समाविष्ट नसल्यास, चुकीचा तपशील आढळल्यास अथवा अन्य कोणत्याही तक्रारीसाठी दिनांक ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत विहित नमुन्यात संबंधित BLO किंवा तहसील कार्यालय, वसमत यांच्याकडे अथवा दिनांक १९, २०, २६ व २७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित विशेष शिबिरांमध्ये दावे व हरकती सादर करता येतील. सर्व प्राप्त दावे व हरकतींची पडताळणी करून अंतिम मतदार यादी दिनांक ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे
मतदारांनी या राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग द्यावा व आपली मतदार नोंदणी योग्य असल्याची वेळीच खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे
