वसमत राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी आनंद बडवणे यांची निवड
उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
वसमत / प्रतिनिधी
आमदार राजू भैया नवघरे यांनी वसमत शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) गट यांचा पक्ष अधिक बळकट करण्यासाठी तरुण व तडफदार नेतृत्व आनंद उर्फ रवी बडवणे यांची राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी अधिकृतपणे निवड करण्यात आली असून, मुंबई येथे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी वसमतचे आमदार राजू नवघरे, नगरध्यक्ष सुनीता बाहेती, अनिल पतंगे, नगरसेवक शेख हबीब, गटनेता सचिन दगडू, राजू इंगले, कन्हैया बहेती, अमजद खान हे उपस्थित होते. या निवडीमुळे वसमत शहरातील राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बांधणीला नवे बळ मिळणार असल्याचे पक्षांतर्गत वर्तुळात बोलले जात आहे.
रवी बडवणे हे गेल्या अनेक वर्षापासून पक्षाच्या विविध उपक्रमांत सक्रिय राहिले असून, सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी स्वतः
ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्थानिक पातळीवर जनसंपर्क मजबूत ठेवत त्यांनी पक्षाची धोरणे आणि विचार सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर वसमत शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही रवी बडवणे यांना शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली वसमत शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
