जिल्ह्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी, वसमतला ईदगाह मैदानावर आ. नवघरे सहित मान्यवरांची उपस्थिती
आज पवित्र रमजान ईदच्या शुभप्रसंगी वसमत येथील ईदगाह मैदानावर उत्साह, आनंद आणि भक्तीमय वातावरणात ईद साजरी
करण्यात आली. या मंगलमय प्रसंगी आ. राजू भैया नवघरे यांनी उपस्थित राहून सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
पवित्र ईद-उल-फितर निमित्त वसमत शहरात आज श्रद्धा, शिस्त आणि ऐक्याचा अद्वितीय संगम पाहायला मिळाला. शहरातील ईदगाह मैदानावर सकाळपासूनच हजारो मुस्लिम बांधवांची गर्दी उसळली होती. नमाज सुरू होताच संपूर्ण परिसर भक्तिभावाने भारावून गेला आणि हजारोंनी एकाच वेळी नमाज अदा करत बंधुभावाचा अनोखा संदेश दिला.
या भव्य नमाज कार्यक्रमाला वसमतचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांनी उपस्थित राहून सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत सणाच्या आनंदात सहभागी होत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
यावेळी शहरातील मान्यवर, व्यापारी वर्ग, कर्मचारी वर्ग, पोलीस प्रशासन तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस विभाग, स्वयंसेवक आणि सामाजिक संस्थांनी शिस्तबद्ध व्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
ईदगाह वरील कार्यक्रमानंतर वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे .आतिश दांडेगावकर .नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैया बाहेती .सर्व सन्माननीय नगरसेवक, कर्मचारीवर्ग, प्रतिष्ठित नागरिक तसेच गुत्तेदार यांच्या सोबत मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेत “ईद मुबारक”च्या शुभेच्छा दिल्या. प्रत्येक घरात जाऊन त्यांनी आपुलकीने संवाद साधत समाजात सलोखा आणि बंधुभाव टिकून राहावा, असा संदेश दिला.नमाजानंतर एकमेकांना शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यात आली. सर्वत्र आनंद, उत्साह आणि शांततेत ईद साजरी करण्यात आली
या प्रसंगी अनेक मान्यवर, नागरिक व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून ईदचा आनंद द्विगुणित केला..!
