” नवे नेतृत्व, नवी भरारी !महाराष्ट्र प्रांतीय सो. स. क्षत्रीय समाजाच्या अध्यक्षपदी श्री. भगवान कुदाळे व सचिव पदी विजय कडतन यांची नियुक्ती.”
वसमत :- आज दिनांक 22 मार्च 2026 रोजी वसमत येथे महाराष्ट्र प्रांतीय सोमवंशीय सहस्त्रअर्जुन क्षत्रीय समाजाची वार्षिक सर्व साधारण सभा अतिशय उत्साहात संपन्न झाली.
सकाळी ठीक दहा वाजता वसमत येथील अदिती लान्स या ठिकाणी महाराष्ट्र प्रांतीय सोमवंशीय सहस्त्रर्जुन समाजाची वार्षिक सर्व साधारण सभेला सुरुवात झाली.
व्यासपीठवर महाराष्ट्र प्रांतिक चे अध्यक्ष श्री जयवंत सावजी पवार, श्री संदीप सावजी चव्हाण,श्री गजानन सावजी शालगर, श्री रवी सावजी रोडगे, श्री डॉ.सुभाष राऊत,श्री प्रविण सावजी दानेज, श्री सुरेश सावजी कडतन, श्री विलास सावजी दानेज, श्री विलास सावजी लदवा, श्री लक्ष्मण सावजी खिडके,श्री यशवंत सावजी रावतोळे,श्री राजेंद्र सावजी परिहार, श्री सचिन सावजी कट्यारे, श्री भगवान सावजी कुदाळे, श्री विजय सावजी कडतन, श्री शिवराम सावजी काटवे, ई मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते आपले आद्य पुरुष श्री राज राजेश्वर सहस्त्रर्जुन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले.
व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व तसेच बाहेर गावाहून आलेल्या ग्रामसभेचे अध्यक्ष तथा पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले.
सर्व साधारण सभा ही दोन सत्रात करण्यात आली पहिल्या सत्रा मध्ये सर्वप्रथम मागील झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इति वृत्तांताचे महाराष्ट्र प्रांतीय क्षत्रीय समाजाचे सचिव श्री रवी सावजी रोडगे यांनी वाचन केले व त्यास उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी संमती दिली.
तसेच महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये आपल्या क्षत्रिय समाजातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा यावेळी श्री जयवंत सावजी पवार यांच्या हस्ते शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून वसमत येथील श्री सचिन सावजी दगडू, श्री संकेत सावजी नामपल्ली, सौ. शकुंतला गोपाळ सातपुते जालना येथील सौ अनिता मोहनसा खोडवे, पारोळा येथील श्री गोपाळ सावजी दाणेज, मानवत येथील सौ.ज्योती विष्णूसा आळसपुरे,संगमनेर येथील श्री किशोर सावजी पवार,श्री अभिषेक सावजी वाळवेकर ई मान्यवराचा सत्कार करण्यात आला.
तसेच येवला येथील समाजबांधव श्री राजेश सावजी भांडगे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला तसेच वसमत येथील श्री भारत सावजी नामपल्ली यांची शिवेश्वर नागरी सहकारी बँकेवर उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
तसेच महाराष्ट्र प्रांतिक चे अध्यक्ष श्री जयवंत सावजी पवार यांनी आज पर्यन्त केलेल्या सामाजिक क्षेत्रात कार्याबद्दल शाल श्रीफळ सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा श्री भगवान सावजी कुदाळे, श्री विष्णू सावजी बोचकरी यांनी सत्कार केला.
यावेळी काही समाज बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये सो स क्षत्रिय समाज मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्री गणेश सावजी कमळू यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच जालना येथील नगरसेविका सौ अनिताताई खोडवे, सौ. कल्पना नाकोड तसेच रमेश सावजी दुमाणे, डॉ सुभाष राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दुपारच्या सत्रा मध्ये नवनियुक्त प्रांतीय सदस्य व पदाधिकारी यांची निवड करण्यात आली
निवडणूक अधीकारी म्हणून ऍड. मनोहर सावजी वाघीले यांनी काम पाहिले व त्यांनी नवनिर्वाचित सदस्य व पदाधिकारी यांच्या नावाचे वाचन केले.
यामध्ये नवनिर्वाचित सदस्य व पदाधिकारी यांची नावे पुढीलप्रमाणे..
नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून श्री भगवान पांडुरंग कुदाळे वसमत, श्री रविंद्र सावजी रोडगे उपाध्यक्ष संगमनेर,श्री विजय श्रीरंगसा कडतन सचिव वसमत, श्री सुरेश लक्ष्मण सा कडतन सहसचिव मानवत, श्री सचिन बाबुराव कंकरेज खजिनदार नाशिक, नवीन सदस्य पुढील प्रमाणे श्री सचिन भारतसा क्षत्रिय सदस्य सिन्नर, श्री गजेंद्र शंकरसा चव्हाण अंजनगाव सुर्जी, श्री गोपाळ रमेश रोडगे सदस्य सोलापूर, श्री गणेश प्रभाकर रामलिंग पुणे,श्री जनार्दन दिनासा पवार पुणे, श्री लक्ष्मण शांतारामसा खिडके भिवंडी, श्री राजेश शांतीलालसा भांडगे येवला, श्री राजेंद्र निवृत्तीसा परिहार अमरावती, शिवराम मेघश्याम काटवे , कोल्हापूर श्री प्रवीण मुरलीधर दाणेज पारोळा श्री गणेश प्रल्हाद रावतोडे धरणगाव विजय विष्णुसा लदवा बदनापूर, श्री यशवंत हनुमंतदाससा मिंगजी श्री गजानन रामलाल रावतोळे ठाणे, श्री नंदकुमार सखाराम ढालकरी नाशिक,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल कमळू यांनी केले.
