वसमत नगरपरिषद उपाध्यक्षपदी राजकुमार एंगडे यांची बहुमताने निवड
वसमत (प्रतिनिधी ):
वसमत येथील नगरपरिषद उपाध्यक्ष पदासाठी नगरवासीयांच्या नजरा या निवडीकडे लागल्या होत्या व त्यासाठी उत्सुकता लागून असलेल्या या नगर उपाध्यक्ष पदासाठी अखेर सर्वानुमते व आमदार राजू भैया नवघरे यांच्या सूचनेने नगरसेवक राजकुमार एंगडे यांची बहुमताने वसमत नगर परिषद उपाध्यक्ष साठी निवड झाली
वसमत येथे आज दिनांक रोजी वसमत नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राजकुमार एंगडे यांची निवड झाली त्यामध्ये यांचा सत्कार करताना प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार सारंग चव्हाण साहेब .नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर .नगराध्यक्ष सौ सुनीता बाहेती .
व त्यानंतर वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे .लक्ष्मीकांत भैय्या नवघरे .उमाकांत भैया नवघरे .यांनी देखील राजकुमार एंगडे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला
त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास हार अर्पण करण्यात आला व तसेच गवळी मारुती मंदिर या ठिकाणी देखील पूजन करण्यात आले व त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला
वसमत नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी राजकुमार एंगडे यांची बहुमताने निवड झाली आहे. या निवडीमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला
.निवडीनंतर कार्यकर्त्यांचा जल्लोषराजकुमार एंगडे यांच्या निवडीची घोषणा होताच नगरपरिषद परिसर आणि शहरात त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. “राजकुमार एंगडे आगे बढो” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला.
शहराच्या विकासाला गती देणार: राजकुमार एंगडेनिवडीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनिर्वाचित उपाध्यक्ष राजकुमार एंगडे यांनी सर्व नगरसेवकांचे आणि वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. “शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवणे, रस्ते, पाणी आणि स्वच्छतेच्या समस्या दूर करणे ही माझी प्राथमिकता असेल. सर्वांना सोबत घेऊन वसमत शहराच्या विकासाला अधिक गती देणार,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.याप्रसंगी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एंगडे यांच्यावर सध्या राजकीय आणि सामाजिक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
