वसमत शहर आणि गणेश पेठ अंधारात! महावितरणने तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करावा; नागरिकांचे निवेदन
वसमत ( प्रतिनिधी ) :
वसमत शहरातील पोलीस क्वार्टर्स डीपी अंतर्गत येणाऱ्या गणेश पेठ भागातील वीजपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने होण्यासाठी आज महावितरणला निवेदन सादर करण्यात आले.
वसमत शहर व गणेश पेठ या भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक आणि व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी नवीन डीपी बसविण्याची मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष श्री.विष्णू बोचकरी, माजी नगराध्यक्ष श्री.विजय कडतन, प्रा.गणेश कमळू, श्री.अमोल मुळे, श्री.रफियोदिन अहमद शमशुद्दीन मोदी, श्री.अविनाश गायकवाड, श्री.राजू भालेराव, श्री.पांडुरंग देसाई, श्री.रवी सूर्यवंशी, श्री.संजय काकडे, श्री. भारत स्वामी, श्री.बंडू बोबडे, श्री.सिताराम म्यानेवार, श्री.शिवाजी अलडिंगे, श्री.गंगाप्रसाद सातपुते, श्री.कृष्णा भालेराव, श्री.बालाजी कासार यांची उपस्थिती होती.
