श्री सहस्त्रार्जुन नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी श्री पांडुरंगसा श्रीरंगसा लांडगू यांची बिनविरोध निवड
वसमत ( प्रतिनिधी ) :
वसमत येथील श्री सहस्त्रार्जुन नागरी सहकारी पतसंस्थेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत वसमत येथील सामाजिक कार्यकर्ते व सरस्वती मंदिराचे विश्वस्त श्री पांडुरंगसा श्रीरंगसा लांडगू यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली
तसेच उपाध्यक्ष पदासाठी सौ नीता अनिलसा कमळू यांची बिनविरोध निवड करण्यात आली
यावेळी झालेल्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेसाठी सर्व संचालक मंडळाची उपस्थिती होती यावेळेस सर्व संचालक मंडळांनी एकमताने बिनविरोध अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नाव सूचित केले
संस्थेचा भरभराटीसाठी व विकासासाठी सामाजिक क्षेत्रात योगदान असलेले श्री पांडुरंग सावजी लांडगू हे माऊली सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदावर सुद्धा कार्यन्वित असल्याकारणाने यांची सहकार क्षेत्रात सुद्धा चांगल्या प्रकारे अनुभव संस्थेसाठी कामी येणार आहे
त्यामुळे संस्थेच्या सर्व संचालकांनी एकमताने श्री पांडुरंगसा श्रीरंगसा लांडगू व सौ नीता अनिलसा कमळू यांची बिनविरोध निवड करण्यात आली
या निवडीमुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे सर्व समाज घटकांकडून स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे
