वसमत येथे S. I. R. मोहिमेचा मा. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
वसमत (प्रतिनिधी ) :
हिंगोली जिल्ह्यात दिनांक 30.06.2026 वार मंगळवार पासून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्ष मतदार पडताळणीची मोहीम सुरू होत आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करणार असून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-2026 च्या अनुषंगाने मतदारांना मतदार गणना प्रपत्र भरुन विहीत वेळेत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे सादर करण्याकरीता दिनांक 12.07.2026 रोजी तहसिल कार्यालय, वसमत येथे तालुक्यातील सर्व प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी यांचे समवेत पत्रकार परीषद आयोजित करण्यात आली.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती प्रगती चोंडेकर 92- वसमत मतदार नोंदणी अधिकारी श्री. विकास माने निवडणूक संबंधी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच वसमत तालुक्यातील सर्व प्रसार माध्यचाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदरील पत्रकार परीषदेत खालील प्रमाणे माहिती देण्यात आली.
मतदार यादी भागात एकाच कुटुंबातील मतदार वेगवेगळ्या यादी भागामध्ये विभागले गेले असल्यास दिनांक 05.08.2026 रोजी मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर दावे व हरकती दिनांक 05.08.2026 ते 04.09.2026 या कालावधीत सादर करुन कुटुंबातील मतदार एकाच यादी भागामध्ये समाविष्ट करुन घ्यावे.
मतदार गणना प्रपत्र भरुन घेण्याकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेशी संपर्क साधण्यात यावा या बाबत कळविण्यात आले असुन जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे नाव व संपर्क क्रमांक जिल्ह्याच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
एकाच व्यक्तीच्या नावाने Progeny Mapping झालेले असल्यास आई किंवा वडील यांच्या पैकी इतर नावाने मॅप करुन घ्यावे.
एसआयआर कार्यक्रमाचे वेळापत्रक
-३० जून ते २९ जुलै घरोघरी जाऊन अर्जाचे वाटप, ५ ऑगस्ट प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर हरकती व सूचना स्वीकारण्याची मुदत, ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर हरकतींवरील सुनावणी, ७ ऑक्टोबर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
उपरोक्त कामकाजासाठी नेमणूक केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, अतिरीक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी आपली जबाबदारी पार पाडावी सदरील कामात दिरंगाई अथवा टाळाटाळ केल्यास संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी बैठकीदरम्यान सांगितले
