परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसादजी बोर्डीकर यांची बहुमताने निवड
परभणी (प्रतिनिधी ) :
सर्वसामान्य शेतकऱ्यांची बँक म्हणून समजल्या जाणाऱ्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी मा. श्री. रामप्रसाद बोर्डीकर यांची तसेच उपाध्यक्षपदी मा. श्री. राजेश (भैय्या) पाटील गोरेगावकर यांची बहुमताने निवड झाली आहे
मागील बऱ्याच दिवसाने चर्चेत असलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीं नंतर अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच चालू असल्याचे राजकीय वर्तुळात दिसून येत होते त्या धरतीवर आज झालेल्या बैठकीत माजी आमदार रामप्रसाद जी बोर्डीकर यांची बहुमताने अध्यक्षपदी वर्णी लागली तर उपाध्यक्षपदी राजेश भैय्या गोरेगावकर यांची बहुमताने निवड करण्यात आली
या निवडीबद्दल संचालक म्हणून निवडून आलेले वसमत चे आमदार राजू भैया नवघरे, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर
मंत्री मेघनाताई बोर्डीकर, व संचालक मंडळ यावेळेस उपस्थित होते
निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या
सर्वसामान्य शेतकऱ्यांची बँक समजल्या जाणाऱ्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची सूत्रे बोर्डीकर यांच्या हाती आल्याने बँकेचा कारभार व आलेख नक्की सुधारेल अशी अपेक्षा जनतेतून होत आहे
