नगरपरिषद प्रशासनातर्फे गणेशोत्सव विसर्जनाची तयारी पूर्ण; नागरिकांना सहकार्याचे आवाहन
वसमत प्रतिनिधी :
25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेशोत्सव विसर्जन सोहळा शांततेत, निर्विघ्न व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी नगरपरिषद प्रशासनातर्फे खालीलप्रमाणे सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेतः
विसर्जनाची व्यवस्थाः
1. सार्वजनिक मंडळांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी दगडगाव खदान या ठिकाणी क्रेन मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे.
2. इरिगेशन विहीर या ठिकाणी घरगुती गणपती विसर्जन करण्याकरीता व्यवस्था करण्यात आली आहे.
3. पर्यावरणपूरक व प्रभावी उपाययोजनेसाठी खालील ठिकाणी कृत्रिम कुंड तयार करण्यात आले आहेत.
1. बँक कॉलनी गजानन महाराज मंदिर परीसर
2. सुवर्णकार कॉलनी संत नरहरी महाराज मंदिर परीसर
3. पाटील नगर रोड चन्ने कॉलनी बस स्टॅन्ड पाठीमागे परीसर
सुरक्षा व कायदा-सुव्यवस्थाः
1. मिरवणूक मार्गावरील सर्व मस्जीद, दर्गाह, धार्मीक स्थळावर पडदे झाकण्यात आले आहे.
2. सुरक्षेसाठी दगडगाव खदान व इरिगेशन विहीर येथे बॅरीकेडींग व्यवस्था व सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
विसर्जन मार्ग दुरुस्ती व रोषणाईः मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले असून अडथळा ठरणाऱ्या झाडांची छाटणी करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण मार्गावर पुरेशा दिव्यांची (लाईट्स) व्यवस्था करण्यात आली आहे.
सन 2026 गणेश विसर्जन सोहळा शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी व पावसा अभावी पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळा, पाण्याची बचत करा आणि सर्व गणेशभक्त, सार्वजनिक मंडळे व नागरिकांनी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे. असे नगरपरिषदेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
