कृष्णा बोंगाणे यांच्या अभंगवाणी ने वसमतकर मंत्रमुग्ध
वसमतनगरी भक्तीरसात न्हाली; वसमतकरांनी प्रथमच अनुभवली अभंगवाणी!
वसमत
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त व आमदार राजू भैया नवघरे यांच्या प्रेरणेने जनसेवा सप्ताह निमित्त आषाढी एकादशीचे औचित्य साधून अभंग वाणी चा कार्यक्रम सुरमणी दत्ता चौगुले सभागृहात आयोजित करण्यात आला होता
आंतरराष्ट्रीय दर्जाचे गायक कृष्णा बोंगाणे यांच्या सुरेल अभंगवाणीने वसमतकरांसाठी विशेष मेजवानी त्यानिमित्त ऐकावयास मिळाली
या सप्ताहामध्ये विविध सामाजिक धार्मिक सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत या अंतर्गत रविवारी सुरमणी प्रा. दत्ता चौगुले सभागृहात अभंग वाणी हा भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम गायक कृष्णा श्रीमंतराव बोंगाणे यांची यावेळी उपस्थिती होती त्यांनी त्यांच्या सुरेल अभंग, भक्तिगीते व शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणाने वसमतकर भक्तिरसात न्हाऊन निघाले. उस्ताद रशीद खान यांचे शिष्य असलेले कृष्णादादा बोंगाणे यांनी आपल्या प्रभावी, मधुर आणि भावस्पर्शी व सुरेल आवाजात राष्ट्रीय दर्जाचे गायक कृष्णा बोंगाणे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सुरेल सादरीकरणाला वसमतकरांची दाद मिळाली
या कार्यक्रमात कृष्णाबोंगाणे यांना तबल्यावर कृतकर्णी सरदवे, हार्मोनियमवर मंगेश जावळेकर, व्हायोलिनवर पंकज शिरसाठे, पखवाजवर विश्वेश्वर कोळंबीकर, तसेच देशमुख यांनी उत्कृष्ट साथसंगत करून कार्यक्रमाची रंगत अधिक खुलवली.
कृष्णा श्रीमंतराव बोंगाणे हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ख्यातनाम गायक असून,
उत्कृष्ट गायनासोबतच हार्मोनियम वादनातही त्यांना प्राविण्य आहे. वसमतच्या इतिहासात पहिल्यांदाच अभंगवाणी सारखा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम इतक्या मोठ्या प्रमाणात पार पडला अत्यंत दर्जेदार अशा या अभंगवाणी कार्यक्रमात चा लाभ घेतलेल्या रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली
आमदार राजू पाटील नवघरे यांनी आयोजित केलेल्या या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे
नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैया बाहेती, नगरसेवक शेख हबीब शेख बशीर, गटनेते सचिन दगडू, नगरसेवक राजकुमार एंगडे, धनंजय गोरे, राजुभैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालूमामा ढोरे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
