कन्हैया बाहेती यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
वसमत ( प्रतिनिधी ) :
आमदार राजू भैया नवघरे यांचे विश्वासू व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व, तसेच वसमत नगरपालिकेचे नगराध्यक्ष यांचे प्रतिनिधी कन्हैया बाहेती यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित सोहळ्याला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावून बाहेती यांना शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे
आयोजन केले होते. या सोहळ्याला आ.राजू नवघरे यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून कन्हैया बाहेती यांना शुभेच्छा दिल्या, तसेच उपनगराध्यक्ष इम्रान अली, सचिन दगडू, अमित काबरा, वसिम कुरेशी, आकाश कदम, चंद्रकांत फेगडे आदींची उपस्थिती होती.
या सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व विविध क्षेत्रातील नागरिक, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
