जनकल्याणाचा जागर आणि गुणवंतांचा गौरव! वसमत विधानसभा मतदारसंघात पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न
वसमत,
दि. ११ ऑक्टोबर २०२६:
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सुरमणी स्व. दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह, वसमत येथे ‘नमो सेवा गाथा’ पथनाट्य सादरीकरण आणि वसमत विधानसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणवंतांच्या भव्य पुरस्कार सोहळ्याचे अतिशय उत्साहपूर्ण आणि देखण्या वातावरणात आयोजन करण्यात आले होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन, आयोजन आणि प्रास्ताविक श्री. आतिश भैय्या दांडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. वसमत मतदारसंघाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणे आणि शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री. आतिश भैय्या दांडेगावकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अथक परिश्रम घेतले.

‘नमो सेवा गाथा’ पथनाट्याने वेधले लक्ष
कार्यक्रमात सादर झालेल्या ‘नमो सेवा गाथा’ या पथनाट्याने उपस्थितांची मने जिंकली. आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या २५ वर्षांच्या यशस्वी सार्वजनिक सेवाप्रवासासह केंद्र शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना आणि महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती या पथनाट्याच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आली. नागरिकांमध्ये विविध योजनांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी हे पथनाट्य अत्यंत उपयुक्त ठरले.
अभ्यासपूर्ण सूत्रसंचालनाने वाढवली रंगत
कार्यक्रमाला अधिक रंगत आणि उंची प्राप्त करून देण्याचे काम श्री. प्रकाश इंगळे सर आणि श्री. यल्लप्पा मिटकर सर यांनी आपल्या प्रभावी सूत्रसंचालनातून केले. त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सुयोग्य रीतीने पुरस्कारार्थींच्या कार्याचा परिचय उपस्थित नागरिकांना करून देत, त्यांच्या सामाजिक योगदानाची माहिती प्रभावीपणे मांडली. त्यांच्या या शैलीमुळे सोहळा अधिक सुसूत्र, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.
विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा रॉयल सन्मान
या भव्य पुरस्कार सोहळ्यात वैद्यकीय, उद्योग, शिक्षण, कृषी, सामाजिक कार्य, क्रीडा, साहित्य-कला, पत्रकारिता, कायदा, व्यसनमुक्ती, योग आणि गोसेवा व गोरक्षण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन अत्यंत मानाने गौरविण्यात आले.
क्षेत्रनिहाय पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे :
• वैद्यकीय व पशुवैद्यकीय क्षेत्र: डॉ. विजयप्रकाश नारायण तांभाळे (वसमत), डॉ. मारोती क्यातमवार (वसमत), डॉ. भिमराव मुंजाजी गारोडे (आसेगाव), डॉ. उत्तम विश्वनाथ भागानगरे (वसमत), डॉ. भगवान दगडोबा लोडे (कळंबा), डॉ. भारत उमराव शेळके (पोटा), डॉ. एकनाथ अर्जुनराव बुक्तरे (पशुवैद्यकीय क्षेत्र, आसेगाव).
• उद्योग क्षेत्र: श्री. लक्ष्मिनारायण रामेश्वर मुरक्या (वसमत), श्री. शीतलकुमार चंदुलाल बाफना (वसमत), श्री. यशवंतराव बाबाराव उबारे (वसमत), श्री. सचिन गणेशराव मुळे (जवळाबाजार), श्री. राजेश उत्तमराव वाघ (जवळाबाजार), श्री. नागनाथ सखाराम राखे (जवळाबाजार), श्री. भगवान पांडुरंग राखोंडे (जवळाबाजार), सौ. वनीताताई दंडे (महिला उद्योग क्षेत्र, वसमत), सीए श्री. शुभम लोहिया (उद्योग क्षेत्र, वसमत).
• शिक्षण क्षेत्र: श्री. नारायण सटवाजी जाधव (वसमत), श्री. किशन सदाशिवराव इमडे (वसमत), श्री. जीवनप्रकाश दामोधर कुलकर्णी (वसमत), श्री. बाबुराव पिराजी खराटे (कौठा), श्री. रंगनाथ बाबाराव दंडे (वसमत), सौ. जिजाबाई पंडितराव सारंग (वसमत).
• कृषी क्षेत्र: श्री. मारोती तुळशीराम गाढवे (जवळाबाजार), श्री. आकाश दत्तराव अंभोरे (जवळाबाजार), श्री. बबनराव विठ्ठलराव ढोबळे (आसोला, ता. औंढा), श्री. केदारनाथ रामराव राखोंडे (आजारसोंड), श्री. साहेबराव गोपाळराव शिंदे (पांग्रा शिंदे), श्री. रमेशराव ग्यानदेवराव सांगळे (गोळेगाव).
• सामाजिक क्षेत्र: श्री. तुळशीराम गणपतराव ताटेवार (वसमत), श्री. निवृत्ती नागोराव कुंटे (वसमत), श्री. दासराव रामराव कातोरे (वसमत), श्री. सुभाष नारायणराव भोपाळे (वसमत), श्री. विजयकुमार तुळशीराम अप्पा विभूते (जवळाबाजार), श्री. धोंडीरामजी पुंजाजी अंभोरे (जवळाबाजार), श्री. नागोबा कोंडूसा बोचकरी (वसमत), श्री. शंकर निवृत्तीराव घोटेकर व विष्णू गणेश मंडळ (वसमत), श्री. राजू सिद्दिकी व लायन्स क्लब (वसमत), श्री. रामराज्य भक्त मंडळ (वसमत), सौ. नाजेमा सय्यद (शिरड शहापूर), श्री. एकनाथ शिवाजीराव नागरे (युवा सामाजिक क्षेत्र, पार्डी).
• क्रीडा क्षेत्र: श्री. हरिभाऊ वामनराव रावळे (वसमत), श्री. निवृत्ती शंकरराव बांगर (वसमत), श्री. नवनाथ नानाराव लोखंडे (वसमत), श्री. अमोल भगवानसा बोरीवाले (वसमत), प्रा. डॉ. बंकट नंदलाल यादव (हिंगोली), श्री. नवनाथ रामराव भालेराव (आसेगाव), श्री. विजय गोविंदराव कुदाळे (वसमत), डॉ. शिवशंकर बळीरामअप्पा कापसे (वसमत), श्री. संजय आनंदराव ठाकरे (जवळाबाजार).
• साहित्य व कला क्षेत्र: श्री. केशव विठ्ठलराव खटिंग (कौडगाव), श्री. प्रभाकर रामभाऊ सालमोठे (वसमत), श्री. गजानन लक्ष्मिकांत पाठक (वसमत), श्री. श्रीरंग माधवराव थोरात (वसमत), श्रीमती चारुशीला चिंतामण पैंजणे (वसमत), श्री. लक्ष्मिकांत चंडीकादास जोशी-धानोरकर (वसमत), श्री. शिवदास सिंधुबाई रानबा पोटे (वसमत).
• पत्रकारिता क्षेत्र: श्री. सत्यविजय परशुराम अन्वेकर (वसमत), श्री. पंकज दासराव नांदापूरकर (वसमत), श्री. मोईन कादरी (वसमत).
• गोसेवा व गोरक्षक क्षेत्र: श्री. अतिष गट्टूलाल अग्रवाल (वसमत), श्री. अमोघ विनायक महाराज (वसमत), श्री. गोविंद बबनराव घुसे (वसमत).
या भव्य सोहळ्याला वसमत विधानसभा मतदारसंघातील नागरिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पुरस्कारार्थींच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने मतदारसंघातून या स्तुत्य उपक्रमाचे प्रचंड कौतुक होत आहे.
