सी.जे. पी. अध्यक्ष मा. अभिजीत दिपके यांच्यावरील दाखल गुन्हे मागे घ्या – स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
वसमत (प्रतिनिधी) :
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मा. अभिजीत दिपके यांच्यावर औसा पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर समविचारी संघटनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी वसमत यांना निवेदन देण्यात आले
सी जे पी चे अध्यक्ष असलेले मा. अभिजीत दिपके औसा येथे विविध सरकारी शाळांचे गुणांकन व सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी जागोजागी भेट देत आहेत
तसेच सरकारी शाळांची गुणवत्ता वाढावी व गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी औसा तालुक्यातील एका शाळेत दिलेल्या भेटीत शासकीय कामात अडथळा व इतर कलमाद्वारे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणावरून सध्या विविध स्तरावरून विरोध दर्शवण्यात येत आहे
सदरील घटनेत अभिजीत दिपके यांच्यावर दाखल झालेल्या गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे , शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समिती, संभाजी ब्रिगेड, व इतर समविचारी पक्षांच्या वतीने उपविभागीय अधिकारी वसमत यांना निवेदन देऊन मा. अभिजीत दिपके यांच्यावरील दाखल गुन्हे मागे घ्यावे यासाठी निवेदन देण्यात आले
अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे
