वसमत येथील दसरा महोत्सवाचे उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते आज होणार उद्घाटन
दसरा महोत्सवात ‘कृषी मेळावा, कृषी मार्गदर्शन व पशु चारा नियोजन २०२६’ चे भव्य आयोजन!
वसमत प्रतिनिधी :
वसमत येथील दसरा महोत्सवाचे आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता उपविभागीय अधिकारी श्री विकास माने यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाला तहसीलदार सारंग चव्हाण तसेच प्रशासनातील अधिकारी कर्मचारी दसरा महोत्सव समिती सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे
तसेच या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन दसरा महोत्सव समिती तर्फे करण्यात आले आहे
तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन, कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत व पूर्णा सह. सा. कारखाना वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सार्वजनिक नवरात्र (दसरा) महोत्सव, वसमत अंतर्गत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता हा भव्य ‘कृषी मेळावा, कृषी मार्गदर्शन व पशु चारा नियोजन २०२६’ पार पडणार आहे.
हा कार्यक्रम वसमत येथील प्रदर्शन जिल्हा परिषद मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्रमुख उपस्थिती आणि उद्घाटन
या मेळाव्याचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतचे सभापती श्री तान्हाजीराव बेंडे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी परिसरातील अनेक नामांकित राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, ज्यामध्ये श्री लक्ष्मीकांत नवघरे, श्री बालाजी यशवंते, सौ. उज्ज्वलाताई तांबाळे, श्री सुभाष नारायणराव भोपाळे, श्री सचिन भोसले, श्री कन्हैया बाहेती, श्री अनिल कदम, श्री राजेश पवार, श्री देविदास कन्हाळे, श्री दौलत हुंबाड, श्री प्रल्हाद रखोंडे, श्री रमेश दळवी, श्री गोरख पाटील आणि श्री विजयराव नरवाडे या मान्यवरांचा समावेश आहे.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
शेती आणि पशुपालनाविषयी शेतकऱ्यांना आधुनिक व योग्य माहिती मिळावी यासाठी विशेष मार्गदर्शकांचे सत्र आयोजित केले आहे:
• श्री गडदे सर (कृषी विद्यावेत्ता, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी) – आधुनिक शेती पद्धतींवर मार्गदर्शन करतील.
• श्री दिगांबर पटाईत सर (कृषी कीटक शास्त्र) – पिकांवरील रोग आणि कीड नियंत्रणाविषयी माहिती देतील.
• श्री डॉ. अजय मुस्तरे (सहायक आयुक्त व दुग्ध व्यवसाय) – पशुपालन आणि दुग्ध व्यवसायातील संधींविषयी मार्गदर्शन करतील.
कृषी समितीचे श्री प्रदिप कच्छवे, श्री सुनिल भिसे, श्री रामेश्वर गवळी तसेच पशु वैद्यकीय समितीचे श्री डॉ. शिवाजी बुचाले आणि श्री डॉ. भास्कर बिरादार यांच्यासह कृषी संयोजन समितीचे सर्व सदस्य या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
हा मेळावा भागातील शेतकरी आणि पशुपालकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
