वसमतमध्ये घुमला बाप्पाचा गजर! सो. स. क्षत्रिय समाज गणेश मंडळाकडून लाडक्या बाप्पाला उत्साहात निरोप!
पहिल्यांदाच महिला व युवती यांचे ढोल ताशा पथकाचे उत्कृष्ट सादरीकरण….
वसमत :
यंदाच्या गणेशोत्सवात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असतानाच, ‘सो सो क्षत्रिय समाज’ गणपती मंडळाच्या युवतींच्या ढोल-ताशा पथकाने आपल्या अद्भूत सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत या रणरागिणींनी शिस्तबद्ध पद्धतीने आणि पारंपारिक वेशभूषेत केलेल्या ढोल-ताशाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. फेट्याचा राजेशाही थाट मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवतींनी पारंपारिक वेशभूषा , डोक्यावर मानाचा फेटा आणि कपाळावर चंद्रकोर असा मराठमोळा आणि राजेशाही थाट परिधान केला होता. त्यांचा हा आत्मविश्वासू आणि उत्साही लूक उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.
कडकडाटाने वेधले हजारो भाविकांचे लक्ष केवळ पेहरावच नाही, तर ढोल-ताशाच्या तालावर पडणारी प्रत्येक काठी आणि झांजेची जुगलबंदी पाहून उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला. पथकातील युवतींच्या हातातील ताकद आणि चेहऱ्यावरील उत्साह पाहून नागरिकांनी त्यांच्यावर टाळ्यांचा कडकडाट करत कौतुकाचा वर्षाव केला. महिला सक्षमीकरणाचे आणि संस्कृती जतनाचे एक उत्तम उदाहरण या पथकाने सर्वांसमोर ठेवले आहे.
ढोल ताशा पथकात सहभागी होणाऱ्या महिला व युवती पुढील प्रमाणे…
1) जयश्री विनोद कडतन
2) मंगल अशोक सातपुते खानापुरे मॅडम
3) वनिता सागर लालपोतू
4)अंकिता गणेश कमळू
5)आशा विठ्ठल सातपुते
6) कांचन अर्जुन लालपोतू
7) अश्विनी सचिन कडतन
8) प्रियंका भूषण लालपोतू
9) निशी राजेंद्र लालपोतू
10) पुनम शुभम दुमाने
11) सुषमा नंदकुमार सातपुते
12) वंदना बालाजी कमळू
13) सविता अनंत नाकोड
14) कोमल सचिन सातपुते
मार्गदर्शक..सुनील उर्फ नाना पवार
या गणपती विसर्जनासाठी यावेळी सो स क्षत्रीय समाज विश्वस्त मंडळ गणपती मंदिर तसेच सर्व समाज बांधव, महिला मंडळ, युवती मंडळ,युवक मंडळ यावेळी मोठ्या संख्येने सहभाग झाले होते.
अतिशय उत्साहाच्या वातावरणात यावेळी गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या युवतींनी गेल्या अनेक दिवसापासून या सादरीकरणासाठी कठोर सराव केला होता. यासाठी समाज बांधव सुनील पवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले त्यांच्या या मेहनतीचे आज सर्व स्तरांतून कौतुक होत असून, सोशल मीडियावरही या पथकाचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत.
