वसमतकरांसाठी आज भक्तीची अपूर्व पर्वणी! ‘कृष्णरंग’ – भावगीत व अभंगांचा बहारदार कार्यक्रम
वसमत, (प्रतिनिधी) :
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त वसुमती सांस्कृतिक प्रतिष्ठान व नगर परिषद, वसमत, जि. हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता ‘सुरेल संगीत महोत्सवाचे २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सुरमणी प्रा. दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह, वसमत येथे होणार आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित या विशेष संगीत मैफलीत शास्त्रीय संगीत, भावगीत, भक्तिगीत व अभंगांची सुरेल मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. पुणे येथील प्रसिद्ध गायक श्री. नागेश आडगावकर हे गायन सादर करणार असून ते उस्ताद राशिद खान यांचे शिष्य आहेत.
कार्यक्रमात भरतनाट्यम् कलाकार कु. सानिका शिंदे, मुंबई यांचे नृत्य सादरीकरण होणार आहे. तसेच तबला वादन श्री. प्रशांत गाजरे, बासरीवादन अनहद वारसी, संवादिनीवादन श्री. मंगेश जवळेकर आणि पखवाजवादन श्री. विश्वेश्वर कोलंबीकर यांची साथ लाभणार आहे.
या कार्यक्रमास सौ. रूपलक्ष्मी चौगुले (शिंदे) यांची विशेष उपस्थिती राहणार असून त्या प्रसिद्ध सिने-अभिनेत्री तसेच प्रा. दत्ता चौगुले यांच्या कन्या आहेत.
वसमत शहरातील संगीतप्रेमी व रसिकांनी या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘ सुरेल संगीत महोत्सवाचा २०२६ चा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक वसुमती सांस्कृतिक प्रतिष्ठान व नगर परिषद, वसमत यांच्या वतीने करण्यात आले आहे.
