हिंगोली जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी मो. नईम कुरेशी यांची निवड
वसमत (प्रतिनिधी ) :
वसमत शहरातील कंत्राटदार क्षेत्रातील असंख्य कंत्राटदारांचे मार्गदर्शक आणि एक अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले *मो. नईम मो. गौस कुरेशी* यांची *हिंगोली जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड* झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या निवडीचे औचित्य साधून आज वसमत येथे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार *मा. राजूभैया नवघरे* यांच्यासह त्यांचे पिताश्री *श्री. रमाकांत पाटील नवघरे* व *श्री. लक्ष्मीकांत नवघरे* यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी *महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष श्री. अमितकुमार काबरा* यांचा देखील शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी, *हिंगोलीचे आमदार मा. तानाजी मुटकुळे* व *कळमनुरीचे आमदार मा. संतोष बांगर* यांनीही श्री. कुरेशी यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या होत्या.
या कार्यक्रमास *मोबिन दादा, लालासेठ उबारे, अझगरभाई पटेल, राजुदादा येंगडे, गौतमभाऊ वाहुळे, हरून दालवाले, वसंतसेठ चेपुरवार, प्रमोद उबारे साहेब, शेख मजहर, मो. वसीम कुरेशी, वामन हिरवे, एन. आय. पठाण, कलीम भाई, जावेद भाई* यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीमुळे वसमतच्या कंत्राटदार क्षेत्राला नवी दिशा मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
