वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराजांचा ॲड चंद्रकांत देवणे मित्र मंडळाच्या वतीने भव्य सत्कार
वसमत ( प्रतिनिधी ) :
ज्ञान सिंहासन काशी पिठाच्या वतीने दिला जाणारा किर्तन मार्तंड हा पुरस्कार वसमत येथील थोरला मठाचे मठाधीश वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांना प्रदान करण्यात आला आहे पुरस्कार मिळाल्याबद्दल वसमत येथे ॲड चंद्रकांत देवणे मित्र मंडळाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी 33 दांपत्य व शेकडो समाज बांधवांच्या हस्ते महाराजांचा भव्य सन्मान करण्यात आला यावेळी वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले
थोरला मठाचे मठाधीश वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या धर्मकार्याची दखल घेऊन त्यांना किर्तन मार्तंड हा पुरस्कार काशी पिठाच्यावतीने देण्यात आला आहे
लिंगायत समाजातील अत्यंत मानाचा समजला जाणारापुरस्कार मिळाल्याबद्दल ॲड चंद्रकांत देवणे मित्र मंडळाच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते शनिवारी रंगा महाराज मठ सभागृहात सायंकाळी सत्कार सोहळा पार पडला यावेळी 31 दांपत्यांनी सद्गुरु वेदंताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचा भव्य सत्कार केला पाद्य पूजा करून गुरुपूजन करण्यात आले
अत्यंत दिमाखदार देखना भव्य असा हा सत्कार पार पडला फटाक्याची आतिश बाजी करून व पुष्पवृत्तीवरून सद्गुरूंचे स्वागत करण्यात आले
सत्कार सोहळ्याला उत्तर देताना सद्गुरु वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांनी मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले तसेच 33 दांपत्य यांच्या हस्ते सत्कार होणे सन्मान होणे हे सौभाग्य असल्याचे त्यांनी सांगितले वसमतच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली असल्याचे त्यांनी सांगितले थोरला मठ संस्थानची महान परंपरा आहे या परंपरेचा उत्कर्ष होईल वसमतचा सन्मान वाढेल असेच योगदान यापुढे राहील असे त्यांनी यावेळी सांगितले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपप्राचार्य प्राध्यापक किशन आप्पा इमडे यांनी केले कार्यक्रमासाठी समाजातील सर्व स्तरातील मान्यवर समाज बांधव महिला मंडळी आजी-माजी पदाधिकारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याच कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ मातृशक्तींचा गौरव करण्यात आला
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मित्रमंडळाचे अध्यक्ष गजानन कापूसकरी उपाध्यक्ष सत्यनारायण नखाते सचिव दिगंबर हुसे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत मुटकुळे, महादेव बेले रमेश आप्पा पत्रे, त्यांच्यासह मित्र मंडळाच्या सर्व सदस्य बांधव समाज बांधवांनी परिश्रम घेतले
फोटो कृष्णा देवणे वसमत
