व्हॉइस ऑफ मिडीया वसमत तालुका अध्यक्षपदी शमीम सिद्दिकी यांची निवड
वसमत | तालुका प्रतिनिधी
व्हॉइस ऑफ मिडीया पत्रकार संघटना,वसमत तालुक्याची महत्त्वपुर्ण बैठक व्हॉइस ऑफ मिडीया वसमत तालुक्याचे मार्गदर्शक संजयजी बर्दापुरे व प्रा.नामदेव दळवीसर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ पत्रकार शमीमभाई सिद्दिकी यांच्या निवासस्थानी उत्साहपुर्ण वातावरणात पार पडली.
बैठकीची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार तथा नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष शमीमभाई सिद्दिकी आणि व्हॉइस ऑफ मिडीया वसमत शहराध्यक्ष गिरीष देशमुख यांच्या वाढदिवसाच्या उत्साहपुर्ण साजरीकरणाने झाली.उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी दोघांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर झालेल्या संघटनेच्या बैठकीत माजी तालुकाध्यक्ष प्रमोदजी नादरे यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या तालुकाध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया पार पडली.उपस्थित पदाधिकारी व सदस्यांच्या एकमताने वसमतचे ज्येष्ठ पत्रकार शमीमभाई सिद्दिकी यांची व्हॉइस ऑफ मिडीया वसमत तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करून अभिनंदन केले.
यावेळी व्हॉइस ऑफ मिडीया वसमत तालुक्याची नवीन कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली.त्यानुसार तालुकाध्यक्ष – शमीमभाई सिद्दिकी,तालुका उपाध्यक्ष – प्रशांत लोखंडे,सचिव – ॲड.नाहिद सिद्दिकी,सहसचिव – शेख रफिक,कोषाध्यक्ष – नितीन वाघिले,तालुका संघटक – अनिताताई चव्हाण,तालुका सहसंघटक – रशीद पठाण,कार्याध्यक्ष – बालय्या स्वामी,प्रसिद्धीप्रमुख – बालाजी कराळे आणि महिला संघटक – विद्याताई इंगोले यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच बैठकीत व्हॉइस ऑफ मिडीया वसमत तालुक्याच्या कोर कमिटीचीही निवड करण्यात आली.संघटना अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष शमीमभाई सिद्दिकी तसेच नव्या कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.पत्रकारांच्या हक्कांसाठी,सामाजिक बांधिलकी जपत संघटना अधिक मजबुत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
