आ. राजू भैया नवघरे यांनी केले राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन
उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षेचा घेतला आढावा
वसमत (प्रतिनिधी ) :
आज दिनांक 28 जून 2026 रोजी उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे माननीय आमदार श्री राजू भैया नवघरे यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माननीय आमदार यांनी स्वतः बालकांना पोलिओची लस पाजली यावेळी वसमत शहराचे नगराध्यक्ष श्री कन्हैया जी बाहेती तसेच नगरसेवक श्री सचिनजी दगडू श्री धनंजय गोरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते उद्घाटन कार्यक्रमानंतर माननीय आमदार यांनी रुग्णालयाचा सुरक्षेचा आढावा घेतला
मागील काही दिवसापासून उपजिल्हा रुग्णालयात दारुड्यांचा व समाजकंटकांचा त्रास रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांना होत असल्याच्या तक्रारी आमदार राजू भैया नवघरे यांच्याकडे आल्या होत्या त्या दृष्टीने त्यांनी सुरक्षेचा आढावा घेऊन संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या बाबतीत प्रभावी अंमलबजावणी करावी अशी सूचना केल्या
व इतर रुग्णालयात कमीत कमी रुग्ण रेफर करण्याचे सुचविले रुग्णालयात सुरू असलेल्या सुविधा जसे की प्रयोगशाळा एक्स-रे डायलिसिस विभाग या कामाबद्दल समाधान व्यक्त केले रुग्णालयामध्ये सर्व प्रकारचे मेडिसिन उपलब्ध असून रुग्णांनी या रुग्णालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले
यावेळी ॲड रामचंद्र बांगल साहेब . सचिन भोसले . धनु गोरे मुबीन दा . आबदुल सत्तार . सचिन दगडू . वाहुळे .
अजगर पटेल .रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जी व्ही काळे सर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप काळे, नागरी वैद्यकीय अधिकारी डॉ.सनउला खान, डॉ.राहुल पवार , डॉक्टर सौरभ मसारे, श्री डी पी जोगदंड व रुग्णालयाचे इतर कर्मचारी उपस्थित होते
