वसमत भाजपा तर्फे श्री.संजयभाऊ कौडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत SIR अभियान आढावा बैठक.
वसमत ( प्रतिनिधी ) :
आज दि. 21 जून रोजी भारतीय जनता पार्टी, वसमत विधानसभा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली SIR अभियान आढावा व संघटनात्मक नियोजन बैठक अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रतिसादामध्ये यशस्वीरीत्या संपन्न झाली. या बैठकीस BLA-2, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आगामी संघटनात्मक कामकाजासाठी दृढ संकल्प व्यक्त केला.
बैठकीच्या प्रारंभी BLA-1 वसमत विधानसभा प्रमुख श्री. आतिश भैय्या दांडेगावकर यांनी प्रभावी प्रास्ताविक केले. त्यांनी वसमत विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या SIR अभियानाचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर मांडला. अभियानाची सद्यस्थिती, बूथनिहाय प्रगती, कार्यकर्त्यांची भूमिका तसेच आगामी काळातील उद्दिष्टे याविषयी त्यांनी स्पष्ट मार्गदर्शन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि तथ्यपूर्ण मांडणीमुळे कार्यकर्त्यांना अभियानाच्या पुढील टप्प्यांबाबत स्पष्ट दिशा मिळाली.
यानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष मा.श्री. गजाननजी घुगे यांनीही SIR अभियानाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या SIR अभियानाच्या कामकाजाचा आढावा देत विविध मंडळांमधील प्रगती, बूथस्तरावरील उपक्रम आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमांची माहिती दिली.
यानंतर बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री. संजयभाऊ कौडगे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. संजयभाऊंनी आपल्या ओजस्वी आणि प्रेरणादायी भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. संघटन बळकट करण्यासाठी बूथ हा पक्षाचा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचे सांगत त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने बूथस्तरावर सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.
संजयभाऊ कौडगे यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून पक्ष संघटनाची कार्यपद्धती, जनसंपर्क वाढविण्याचे मार्ग, बूथ व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये नव्या उमेदीचा आणि आत्मविश्वासाचा संचार झाला. आगामी काळात प्रत्येक बूथ अधिक सक्षम करून पक्षाची ताकद वाढविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री. गजाननजी घुगे, श्री.गुरुपादेश्वर महाराज, महिला जिल्हाध्यक्ष उज्वलाताई तांभाळे, प्रभाकर रेंगे, गणेश कमळू, दौलतराव हुंबाड, विजय कडतन, शिवाजी अलडिंगे,आदित्य देशपांडे, एम.डी.अंभोरे, वसमत शहराध्यक्ष विष्णू बोचकरी, पश्चिम मंडल अध्यक्ष ज्ञानदेव मुंजाळ, जवळाबाजार मंडल अध्यक्ष राजू पाटील आहेर, अमोल मुळे, प्रीतीताई जयस्वाल, अंकुश आहेर, रमेश सानप, संजय काकडे, भगवानराव कावळे, मुनिता जाधव, संतोष सोमाणी,रत्नमालाताई शिंदे, राजेश भालेराव, स्वप्निल मुळे, ज्ञानोबा काळे, विठ्ठल गायकवाड, गोविंदराव ढेंबरे, तुकाराम साळवे, संदीप भालेराव, मुंजाजी चट्टे, पांडुरंग नवटक्के, वैभव अन्वेकर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी, BLA-2 व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत संघटन विस्तार, SIR अभियानाची प्रभावी अंमलबजावणी आणि आगामी राजकीय व संघटनात्मक कार्यक्रमांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण सभागृह भरगच्च भरले होते त्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
बैठकीचा समारोप पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा आणि प्रत्येक बूथपर्यंत पक्षाचे कार्य प्रभावीपणे पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करत करण्यात आला. संजयभाऊ कोडगे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. संपूर्ण बैठक अत्यंत सकारात्मक, आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
