महाराष्ट्र अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा 10 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
वसमत (प्रतिनिधी) :
वसमत शहरातील अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीला उतरलेल्या व उत्कृष्ट सेवेसाठी प्रसिद्धीस आलेल्या महाराष्ट्र अर्बन कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी वसमत यांच्या दहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व थाटामाटात संपन्न झाला
दिनांक 11 जून 2026 रोजी झालेल्या या वर्धापन दिन सोहळ्याला ग्राहक, खातेदार सन्माननीय सदस्य, राजकीय मंडळी , तसेच व्यापारी वर्ग , ज्येष्ठ नागरिक यांनी उपस्थिती देऊन बँकेचे सन्माननीय अध्यक्ष रवी भुसावळे व व्यवस्थापक संदीप सूर्यवंशी यांचे अभिनंदन केले
दहाव्या वर्षात पदार्पण केलेल्या महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विकासाचा आलेख व आर्थिक घोडदौड कायम ठेवत ग्राहक व सदस्यांना टू व्हीलर, फोर व्हीलर, गोल्ड लोन, पर्सनल लोन, आरटीजीएस, एनएफटी , अशा विविध सुविधा देऊन बँकेने आपला आलेख उंचावला आहे
बँकेचे सन्माननीय अध्यक्ष रवि भुसावळे यांनी सांगितले की ग्राहक, सभासद व वसमत तालुक्यातील नागरिकांनी बँकेच्या विविध सेवेचा लाभ घ्यावा व तसेच बँकेचे आदरपूर्वक तत्पर सेवा हीच बँकेची विकासाची गुरुकिल्ली असल्याचे अध्यक्ष रवी भुसावळे यांनी लोकपर्व न्यूज शी बोलताना सांगितले
