अतिश भैया दांडेगावकर यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
प्रतिनिधी :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हिवरा, वसमत येथे आयोजित कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी ध्वजवंदन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच वाचनालयासाठी सहकार्य असे विविध उपक्रम राबविण्यात आले. शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांना ग्रामस्थ व समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायनिष्ठ नेतृत्व आणि समाजहिताची परंपरा जपणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला यानिमित्ताने अभिवादन करण्यात आले. नव्या पिढीला शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेची प्रेरणा देणारा हा जयंती सोहळा संस्मरणीय ठरला.
यावेळी श्री.दौलत हुंबाड, श्री.अमोल मुळे, श्री.मंचकराव काळे, श्री.ग्यानोबा काळे, श्री.राम झुंजूर्डे, श्री.वड्डे सर, श्री.उद्धव माखने, श्री.केदार भालेराव, श्री.श्रीकांत भुमरे, श्री.दत्तराव काळे, श्री.गंगाधर काळे, श्री.कामान मुळे, श्री.भगवान भालेराव, श्री.विश्वनाथ गवारे, श्री.गोविंदराव मामा, गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
#अहिल्यादेवी_होळकर #जयंती #हिवरा_वसमत #PunyashlokAhilyadeviHolkar
