वसमत येथे खा. रामरावजी वडकुते व आ. प्रज्ञाताई सातव यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न
वसमत (प्रतिनिधी) :
दिनांक 24 रोजी सकाळी 11 वाजता आदिती लॉन्स मंगल कार्यालय वसमत येथे नवनिर्वाचित खासदार आदरणीय श्री. खा.रामरावजी वडकुते साहेब आणि मा.आमदार आदरणीय श्रीमती प्रज्ञाताई सातव यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्याच्या निमित्ताने पारंपरिक धोंडे जेवणाच्या स्नेहभोजनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून, पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजाननराव घुगे साहेब, हिंगोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब, श्रीकांत पाटील, के के शिंदे साहेब, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजी मामा शिंदे, संजय जी कावडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ उज्वलाताई तांभाळे, जिल्हा उपाध्यक्ष शिवदासजी बोड्डेवार, डॉ. एम आर क्यातमवर साहेब, एन डी देशमुख, श्री गुरुपादेश्वर महाराज, अतिश भैय्या दांडेगावकर, विजयराव नरवाडे, खोबराजी पाटील नरवाडे, ज्ञानेश्वर मुंजाळ, शिवाजी अडलिंगे विष्णू भाऊ भोचकरी, रघुनाथ सूर्यवंशी, बालाजीराव जाधव, प्रभाकर रेंगे विठ्ठल नाना भोसले , एमडी अंभोरे, दौलतराव हुंबड, विजयजी कडतन आदित्य भैया देशपांडे, जगदीश दळवी मदनराव नादरे दिलीपराव पवळे आणि नेत्यांचे स्वागत करण्यासाठी वसमत तालुक्यातील सर्व बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, सर्कल अध्यक्ष, सर्व आदरणीय पदाधिकारी व कार्यकर्ते मंडळी उपस्थित होते.
