अवैध धंदे रोखण्यासाठी नागरिकांनी खबर हेल्पलाइन चा वापर करावा – पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप
तीन आठवड्यात 1215 गुन्हे , 16 कोटी 54 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
हिंगोली ( प्रतिनिधी ) :
दिनांक 01 ते 31 मे, 2026 दरम्यान, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रात गुटखा, मटका/जुगार, अवैध दारु विक्री, अवैध शस्त्र व इतर अवैध व्यवसायांचे विरोधात मोहीम उघडली आहे.
सदर मोहिमे अंतर्गत, दिनांक 01 ते 21 मे, 2026 दरम्यान संपलेल्या तिसऱ्या आठवड्यात, नांदेड परिक्षेत्रात, गुटखा व्यावसायिकांविरुद्ध कलम 123 भारतीय न्याय संहिते अंतर्गत (22), महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत (261), महाराष्ट्र दारुबंदी कायदयान्वये (710) व शस्त्र अधिनियमाअन्वये (62), तर इतर अधिनियमाखाली (160), अशा एकूण (1215) कारवाया करुन (1652) इसमांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात निष्पन्न झालेल्या आरोपीतांकडून 16,54,37,344/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
परिक्षेत्रात सुरू असलेली अवैध व्यवसाय विशेष मोहीम ही पुढील आठवड्यात आणखी व्यापकपणे राबविण्यात येणार आहे.
‘ खबर ‘ हेल्पलाइनचा वापर करा :
अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना देता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले आहे.
