वसमत शहरात खंजर बाळगणाऱ्या दोघांना अटक
स्था.गु शा.वसमत यांची धडाकेबाज कारवाई
वसमत ( प्रतिनिधी ):
हिंगोली पोलीसांर्फे जिल्ह्यात अवैद्य शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात कठोर कार्यवाही करण्याबाबत मोहीम उघडली असून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वसमत शहरात पेट्रोलिंग करीत असताना माहिती मिळाल्यावर आरोपी नामे 1) शैलेश रोहिदास राऊत राहणार कारखाना रोड वसमत 2) कोंडीबा बालाजी क्षीरसागर राहणार कारखाना रोड वसमत यांना वसमत शहरातील हिरो शोरूम जवळ ताब्यात घेऊन अंग झडती घेतली असता त्यांचे जवळ एक धारदार घातक हत्यार खंजर मिळून आले. त्यांना जागीच पकडून पोलीस स्टेशन वसमत शहर येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसातर्फे आवाहन करण्यात येते की कोणी अवैध हत्यार बाळगू नये अन्यथा कठोर कार्यवाही करण्यात येईल.
सदरची कार्यवाही डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक हिंगोली, श्री कमलेश मीना, अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली, श्री मोहन भोसले पोनि स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवसांब घेवारे, पोलीस अमलदार शिवाजी जालमिरे ,आकाश टापरे ,ज्ञानेश्वर गोरे यांच्या पथकाने केली आहे
