वसमत उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांचा जीव टांगणीला; हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!”
वसमत ( प्रतिनिधी ) :
वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेळेवर उपचार न मिळणे आणि डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांचे हाल होत असून, दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 24 एप्रिल रोजी संध्याकाळी छातीत दुखत असलेल्या कारणांनी एक महिला सदरील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आली असता अर्धा ते एक तास कोणतीही उपचार न करता रुग्णालयातील परिचारिका उद्धट भाषेत अपमानास्पद वागणूक दिल्याचे समोर आले आहे
सदरील प्रकरणात छातीत दुखत असल्याकारणाने त्वरित उपचार देण्याचे प्रस्तावित असताना रुग्णालया प्रशासनाकडून होणारी हेळसांड ही चिंतेची बाब आहे
याप्रकरणी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर आपले वैयक्तिक खाजगी प्रॅक्टिस करून शासनाची सेवा बजावत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे रुग्णांना वेळीच उपचार मिळण्यास अडचणी येत असल्याचे तक्रारदार प्रशांत लोखंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे
याप्रकरणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याद्वारे उचित कारवाई करण्याची मागणी तक्रारदार प्रशांत लोखंडे व नागरिकाद्वारे करण्यात येत आहे
