गाव पातळीवर शिवसेनेच्या शाखा उघडा – आ. संतोष बांगर
तालुका प्रमुख राजू चापके यांना दिले सर्वाधिकार
आज दिनांक 23 एप्रिल रोजी झालेल्या शिवसेनेच्या वसमत तालुक्यातील संघटन वाढीसाठी व आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत एक हाती सत्ता स्थापन करण्यासाठी आमदार संतोष बांगर व संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली वसमत येथे वर्धमान मंगल कार्यालयात बैठक संपन्न झाली
यावेळी आमदार संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देऊन गाव पातळीवर व गलो गल्लीत शिवसेनेच्या शाखा स्थापन करून पक्ष बळकट करण्याचे आव्हान केले यावेळी वसमत तालुका अध्यक्ष राजू चापके यांना सर्व अधिकार देण्यात येत आहे असे यावेळी ते म्हणाले
आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेला एक हाती सत्ता मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे त्यांनी आवाहन केले
यावेळी शिवसेना उपनेते तथा हिंगोली लोकसभा संपर्क प्रमुख मा.श्री. आनंदराव_जाधव साहेब शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कळमनुरी विधानसभा मा.श्री. संतोषजी_बांगर साहेब मा.मंत्री श्री. जयप्रकाशजी मुंदडा,यांच्या मुख्य उपस्थितीत आणि कार्यक्रमाचे पार पडला या बैठकीचे मुख्य आयोजक शिवसेना तालुकाप्रमुख #राजुदादा_चापके यांनी केले. यावेळी मा.राजेंद्र शिखरे, महिला जिल्हाप्रमुख मा. रेखाताई देवकते, उपजिल्हा प्रमुख मा. रामकिशन झुंझुल्डे, विधानसभा प्रमुख मा. मच्छिंद्रनाथ सोळंके, उपतालुका प्रमुख मा. बहिर्जी जाधव, उपतालुका प्रमुख मा. विलासराव चव्हाण, तालुकाप्रमुख औंढा मा. राजेंद्र सांगळे, मा. सभापती मा.शिवआप्पा भालेराव, उपसभापती मा.श्री. भगवान काचगुंडे, शहरप्रमुख मा.श्री. प्रभाकर क्षीरसागर,युवा सेना उपजिल्हाप्रमुख व्यंकटेश कराळे,युवासेना तालुकाप्रमुख शिवराज यशवंते, युवासेना तालुकाप्रमुख विशाल ढोरे,नगरसेवक मा.श्री. राजुभाऊ पवार, नगरसेवक मा.श्री. विनायक सातपुते, युवासेना विधानसभा प्रमुख मा.श्री. गोविंद राखोंडे, सर्कल प्रमुख मा.श्री. रुस्तुम मामा सारंग, उपतालुकाप्रमुख दत्तराव नवले व सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.
